अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शेगाव मार्गावर एका विहिरीमध्ये तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तरुणाने आत्महत्या केले असल्याचे असे वाटले. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली. आरोपीने ही हत्या आत्महत्या वाटावी म्हणून विहिरीत दोरीच्या साहाय्याने लटकवली. आरोपींनी हत्या करत आत्महत्येचा बनवा रचला. मात्र त्यांचा हा बनाव फसला. नेमकं काय आहे प्रकरण?
‘त्या’ खुनाचा छडा लागला, मित्रानेच केली मित्राची हत्या; कारण वाचून बसेल धक्का
बाळापूर-शेगाव मार्गावरील सातरगाव शिवारातील विहिरीत दोरीच्या साहाय्याने एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती बाळापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह अनोळखी असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात ठेवून बाळापूर पोलिसांनी ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर मृतकाची अंकुश सुरडकर (३२) रा.निरोळा, ता. संग्रामपूर अशी ओळख पटली.
मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालामध्ये गळा दाबून व डोक्यावर जबर मारहाण करून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. गळा दाबणे आणि डोक्यावरील मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांना ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समजले. आरोपींनी ही हत्या करून विहिरीत दोरीच्या साहाय्याने मृतदेह लटकवले असल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक विनोद हिवराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
गोंदिया हादरला! जादूटोणाच्या संशयावरून 60 वर्षीय वृद्धाची हत्या, आरोपीला अटक
गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एका ६० वर्षीय वृद्धाची जादूटोण्याच्या संशयावरून धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा /हेटी येथे उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव आसाराम देऊ कांबळे (60) असे आहे. ते जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले असतांना त्यांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जादूटोण्याच्या संशयातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
धक्कादायक! महिलेची ६ वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या; कारण वाचून बसेल धक्का