कोर्टाने पोलिसांना फटकारले (फोटो- सोशल मिडिया)
पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राज्यभर चर्चेत आहेत. वैष्णवी आत्महत्याप्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या सुशील हगवणे व शंशांक हगवणे या भावांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सासू, नवरा आणि नणंद यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. दरम्यान या प्रकरणात कोर्टाने पोलिसांना फटकारले असल्याचे समजते आहे.
राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना फरार झाल्यापासून मदत करणाऱ्या लोकांना अटक केल्याने कोर्टाने पोलिसांना तंबी दिल्याचे समजते आहे. आरोपीना तुम्ही नोटिस पाठवू शकला असता. त्यांना अटक करण्याची ये गरज असा परखड सवाल कोर्टाने पोलिसांना विचारला आहे.
आरोपी सुशील आणि राजेंद्र हगवणे ही वैष्णवी मृत्यू प्रकरणात फरार झाले होते. मात्र फरार झाल्यावर त्यांना मदत करणाऱ्या लोकाना पोलिसांनी अटक केली होती. मात्र या आरोपीना कोर्टात हजर केले असतं कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यावरून कोर्टाने पोलिसांना झापले आहे असे म्हटले जात आहे.
सादर गुन्ह्यात नोटिस पाठवू शकला असता. अटक करण्याची काय गरज होती असा सवाल पोलिसांना कोर्टाने विचरला आहे. सदर गुन्ह्यात जामीन मिळू शकतो हे माहिती असताना अटक का केली असा सवाल कोर्टाने पोलिसांना विचारला आहे.