उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात एका पार्कमध्ये शुक्रवारी (31 ऑक्टोबर)ला घडली आहे. त्याने आत्मत्या करणाऱ्या आधी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्याने आत्महत्या करण्याचं कारण लिहिलं होत.
पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी जवळपास ८ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मंगोलपुरीच्या नवारिया पार्कमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव करण चौहान (35) असे आहे. तो विवाहित होता. संबंधित तरुण हा रोजंदारीवर मजूर म्हणून काम करत होता. त्याला ड्रग्सचं व्यसन सुद्धा असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला तीन मुलं सुद्धा असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्याच्या जवळपास एक आठवड्यापूर्वी मृताची पत्नी ही आपल्या मुलांसोबत घर सोडून पळून गेली होती.
सुसाईड नोटमध्ये काय?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या कपड्यांची तपासणी केली असता त्यामध्ये एक सुसाईड नोट सापडली. आपल्या पत्नीचा दुसऱ्या पुरुषासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यात लिहिलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितलं की, झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत पीडित तरुणाचा मृतदेह आढळला होता. घटनास्थळी दोन विटा सुद्धा सापडल्या, यावरून त्याने आत्महत्या करण्यासाठी विटांच्या साहाय्याने झाडावर चढला होता.
पोलिसांचा तपास सुरु
घटनास्थळाचं इन्स्पेक्शन आणि डॉक्यूमेंटेशन करण्यासाठी फॉरेन्सिक एक्सपर्ट्सच्या टीमला बोलवण्यात आलं होतं. मेडिकल टेस्टसाठी तरुणाचा मृतदेह मंगोलपुरीच्या संजय गांधी मेमोरिअल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत असून घटनेने खळबळ उडाली आहे.
अंधाऱ्या राती उत्तर प्रदेशच्या रस्त्यावर दिसून आले भयानक दृश्य, शेकडो तडफडते मासे अन्… थरारक Video Viral
उत्तर प्रदेशातील कानपूरमधून ही घटना समोर आली आहे. येथे सकाळी कानपूर-चौबेपूर महामार्गावरील मारियानी गावाजवळ रस्त्यावर हजारो मासे तडफडताना दिसून आले ज्यांना पाहून सर्वच हैराण झाले. नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
वास्तविक घडलं असं की, माशांनी भरलेली पिकअप व्हॅन डिव्हायडरला धडकली ज्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात मासे रस्त्यावर पसरले गेले. रस्त्यावर पडलेले मासे गावातील इतर लोकांना कळताच, लोकांनी मासे पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे.
यूपी–
कानपुर में मछलियों से लदी पिकअप पलट गई, लोग सड़क से मछलियों को बटोरकर ले गए !! pic.twitter.com/OtHus4dHni — Sachin Gupta (@SachinGuptaUP) October 29, 2025






