शिक्षिकेचे आपल्याच विद्यार्थिनीच्या वडिलांशी शारीरिक संबंध; नग्न फोटो दाखवत मागितले तब्बल 20 लाख (File Photo : Kuntankhana)
बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणी यांसारखे प्रयत्न होताना दिसत आहे. असे असताना आता बंळुरूमध्ये एका महिला शिक्षिकेला ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थिनीच्या वडिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचे फोटोही काढले. याच फोटोच्या माध्यमातून 20 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
श्रीदेवी रुदागी (वय २५) असे महिला शिक्षिकेचे नाव आहे. त्याच्यासोबत गणेश काळे (वय ३८) आणि सागर (वय २८) या सर्वांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. या शिक्षिकेने एका विद्यार्थिनीच्या वडिलांकडून चार लाख रुपये उकळले आणि नंतर त्यांचे प्रायव्हेट फोटो/व्हिडिओचा वापर करून 20 लाख रुपयांची मागणी केली, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. या महिला शिक्षिकेचे विद्यार्थिनीच्या वडिलांशी प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांकडून दिली जात आहे.
दरम्यान, 2023 मध्ये प्रथम या दोघांची भेट झाली. मुलीचे वडील व्यापारी आहेत. सतीश (नाव बदलले) यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीला पश्चिम बंगळुरूमधील एका शाळेत प्रवेश दिला, तेव्हा हे प्रकरण सुरू झाले. त्याच काळात त्यांची भेट रुदागीशी झाली. कालांतराने दोघांमधील संवाद वाढला आणि मग ते वेगवेगळे सिम कार्ड आणि फोन वापरून मेसेज आणि व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांशी बोलू लागले.
आधी 15 लाख मागितले अन् नंतर…
यानंतर रुदागीने सतीशकडून चार लाख रुपये वसूल केले. जानेवारीमध्ये तिने पुन्हा 15 लाख रुपयांची मागणी केली. जेव्हा सतीशने पैसे देण्यास टाळाटाळ केली, तेव्हा रुदागी त्याच्या घरी गेली आणि 50000 रुपये कर्ज मागण्याचे निमित्त करून ती त्याच्याकडे गेली.
खाजगी फोटो दाखवून पैसे मागितले
मार्चच्या सुरुवातीला शाळेत गेल्यानंतर सतिशला रुदागीच्या कार्यालयात बोलावण्यात आले. गणेश काळे आणि सागरही तिथे उपस्थित होते. सागरने सतीश याला त्याचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ दाखवले. तेव्हा त्यांनी जर 20 लाख रुपये दिले नाहीत तर ते फोटो त्याच्या पत्नी आणि कुटुंबाला पाठवले जातील. सतीशने त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि 15 लाख रुपयांचा करार झाला, ज्यापैकी त्याने लगेच 1.90 लाख रुपये ट्रान्सफर केले. पण, वेळोवेळी पैशांची मागणी सुरुच राहिल्याने अखेर त्रस्त झालेल्या सतिश याने पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.