ठाणे पोलिसांची मोठी कारवाई (फोटो- istockphoto)
ठाणे: बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या रोशन जाधव या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने मोठ्या शिताफिने अटक केली आहे आणि त्याच्याकडून 19 लाख 81 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे,अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चोरीच्या गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 4 हे करत होते, त्या अनुषंगाने पोलीस हवालदार गणेश गावडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. या घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी बाळा जाधव हा उल्हासनगर येथील अमरडाय ह्या बंद असलेल्या कंपनी जवळ फिरतआहे, त्या प्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव आणि इतर कर्मचारी यांनी मिळून साफळा रचून रोशन जाधव याला अटक केली.
वय वर्षे 34 असलेला हा आरोपी डोंबिवली पूर्व निळजेगाव येथील हनुमान मंदिर येथे राहण्यास आहे, याला ताब्यात घेतल्या नंतर त्याच्या वर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून घरफोडी गुन्ह्यामधील सोन्या, चांदीचे दागिने, दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, तसेच रोख रक्कम असे एकुण 19,81,360 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व त्याने केलेले आठ गुन्हे उघडकीस आणले. माननीय न्यायालयाने त्याला आज पर्यंत पोलीस कस्टडी दिली होती ती आज वाढवून देण्याची शक्यता आहे.
वडगावमध्ये भरदिवसा घरफोडी
वडगाव बुद्रुक परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दीपाली प्रसाद गुरव (वय ३४, रा. सद्गुरुकृपा बिल्डींग, रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime : वडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज चोरला
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरव यांचे वडील आजारी आहेत. त्यांना डेक्कन जिमखाना भागातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. सोमवारी (२३ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या फ्लॅट बंद करुन रुग्णालयात गेल्या होत्या. रुग्णालयातून त्या सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आल्या. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. चोरट्यानी कपाट उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुरव यांनी रात्री पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.