संविधान विटंबनेतील आरोपीची आत्महत्या; घरातच घेतला गळफास (File Photo : Suicide)
परभणी : राज्याला हादरवून टाकणाऱ्या संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे १० डिसेंबर २०२४ रोजीचे हे संवेदनशील प्रकरण चर्चेत आले आहे. दत्ता सोपान पवार असे मृत आरोपीचे नाव असून, मिर्झापूर येथे घरी त्याने आत्महत्या केली.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मांडलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर सर्वत्र तणाव निर्माण झाला होता. पुढे यातून मोठी दंगल उसळली होती. सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. घटनेतील मुख्य आरोपी दत्ता पवारला पोलिसांनी अटक केली होती. अनेक महिने तपास सुरू होता. न्यायालयीन सुनावणीत दत्ता यास जामीन मिळाला होता. मात्र, त्याची जामीन रक्कम भरण्यास कोणीही पुढे आले नव्हते. त्यामुळे तो बराच काळ तुरुंगातच होता.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; सात लाखांसाठी गर्भवती महिलेचा छळ, अखेर गळफास घेऊन आत्महत्या
अखेर गेल्या ८ जानेवारी रोजी न्यायालयाने स्वतःहून पुढाकार घेत दत्ताची जामिनावर सुटका कण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्याला त्याच्या मूळ गावी मिर्झापूर येथे नेऊन सोडले. चार दिवसांतच आरोपी दत्ताने जीवन संपविले. पत्नी व मुले दूर राहत असल्याने तो घरी एकटाच राहत होता.
कोर्टातच तरुणाची आत्महत्या
साकेत कोर्टात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. हरीश सिंग असे या तरुणाचे नाव आहे, जो साकेत कोर्टात काम करणारा एक लिपिक होता. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. वृत्तानुसार, कामाच्या ताणामुळे त्या तरुणाने आत्महत्या केली. हरीश सिंगने कोर्ट कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यावरून उडी मारली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तथापि, त्याने त्याच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. हरीश ६० टक्के अपंग होता. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेदेखील वाचा : Suicide News: कोर्ट परिसरात धक्कादायक घटना! तरुणांने उडी मारून केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा






