वाद विकोपाला गेला अन्...; तरुणाने प्रेयसीच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
ग्वाल्हेर, मध्य प्रदेश : देशभरात प्रेमसंबंधातून होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. लग्नानंतर अवघ्या १० दिवसात पती राजा रघुवंशीची हत्या करून फरार झाली होती. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली होती. या प्रकरणात सोनमसह तिच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
प्रेमसंबंधांतील वारंवार वाद आणि मतभेदामुळे संतप्त झालेल्या एका युवकाने थेट आपल्या प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना ग्वाल्हेर जिल्ह्यातील एका गावात घडली. स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप करत गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केलं असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
ब्रिटनचे ‘F-35B’ लढाऊ विमान भारतात उतरले; केरळमध्ये आपत्कालीन लँडिंगमागील नेमकं कारण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री उशीरा घडली. अजय कुशवाहा (वय २४) असे या तरुणाचे नाव असून तो सिकंदर कॅम्पजवळील पटिया वाले बाबा मोहल्ल्यात राहणारा आहे. अजय आणि त्याची प्रेयसी एकाच परिसरात राहत होते. दोघांमध्ये काही काळापासून प्रेमसंबंध होते, मात्र अलीकडच्या काळात त्यांच्यात वारंवार वाद होत होते. भांडणं इतकी तीव्र झाली की प्रेयसीने अजयशी बोलणंही थांबवलं होतं.
याच कारणाने मानसिक तणावात असलेल्या अजयने शनिवारी रात्री प्रेयसीच्या घराबाहेर जाऊन स्वतःवर ज्वलनशील द्रव ओतून अंगाला आग लावली. परिसरातील लोकांनी धाव घेत तात्काळ त्याला वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, परिस्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, प्रेयसी व तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी रात्री १२:३० च्या सुमारास ही घटना घडली असून, २४ वर्षीय अजय कुशवाहा या युवकाने थेट अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. सध्या तो ७५ टक्के भाजल्याच्या स्थितीत रुग्णालयात दाखल असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
Crime News: वाद विकोपाला गेला अन्…; तरुणाने प्रेयसीच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
सिकंदर कॅम्पजवळील पटिया वाले बाबा मोहल्ल्यात राहणारा अजय आपल्या शेजारी राहणाऱ्या तरुणीवर प्रेम करत होता. सुरुवातीला दोघांमध्ये संबंध सुरळीत होते, मात्र काही दिवसांपासून वाद आणि मतभेद वाढत चालले होते. यामुळे प्रेयसीने अजयशी बोलणे बंद केले होते. त्यानंतर अजय रागाच्या भरात तिच्या घराबाहेर गेला आणि धिंगाणा घालू लागला. नकारात्मक प्रतिसादाने व्यथित होऊन त्याने अंगावर पेट्रोल ओतले आणि स्वत:ला पेटवून घेतले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि अजयला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, तो ७५ टक्के भाजला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षकांनी सांगितले की, “हा युवक शेजारी राहणाऱ्या तरुणीवर प्रेम करत होता. त्यांच्यात वाद सुरु झाल्यानंतर मानसिक अस्थिरतेमुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.” सध्या प्रेयसीचीही चौकशी करण्यात येत असून, परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.