संग्रहित फोटो
सोलापूर : मे महिन्यातील पहिले तीन दिवस. या तीन दिवसांत सहा खून झाले. त्यात सोलापूर जिल्हा अक्षरशः हादरुन गेला आहे. ज्यांच्या घरात खून झाले ते तीन कुटुंबे तर उध्वस्त झालीच. शिवाय ज्यांनी खून केले त्यांचीही कुटुंबे देशोधडीला लागतील. गुन्हेगारांचे वाढलेले धाडस आणि पोलिस यंत्रणेवर आलेला ताण यामुळे संपूर्ण जिल्हा प्रचंड अस्वस्थ झाल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
मे महिन्याचा पहिला दिवस. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव (शिवाजी नगर) येथे १ मे रोजी संजय विठ्ठल शिंदे (वय ५४) यांची अज्ञात कारणावरून गळा चिरून हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने मानेवर खोल वार केले होते. दुसरा दिवस बार्शी तालुक्यातील वैराग (दत्तनगर) येथे २ मे रोजी दिनेश उर्फ अप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१) यांचा डोक्यात दगड घालून क्रूरपणे खून करण्यात आला. सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील बोरामणी (ता. द. सोलापूर) येथे २ मे रोजी रात्री एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), प्रिया मस्के (वय १८) आणि शिवराज मस्के (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रविवारची सकाळ खुनाच्या बातमीने उजळली
सोलापूर शहरात दिवसाढवळ्या खून. (३ मे) रविवारची सकाळ उजळली तीच मुळात एका खुनाच्या बातमीने. सोलापूर शहरातील सत्तर फूट रोड, माधवनगर परिसरात सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५, रा. नीलम नगर) यांची सहा जणांनी मिळून निर्घृण हत्या केली. दगड व कोयत्याने वार करून हा खून करण्यात आला.
हे सुद्धा वाचा : कात्रज घाटात भीषण अपघात, बस-रिक्षाची समोरासमोर धडक; चालकाचा जागीच मृत्यू
फुरसुंगीत ऐन गर्दीच्यावेळी खुनाचा थरार
पुर्ववैमन्यासातून घडलेल्या रक्तरंजित घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले असून, फुरसुंगीत ऐन गर्दीच्या वेळीच सहा जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खूनाच्या थरारानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. तर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. स्थानिक तरुणांमधील वादविवाद व वर्चस्वातून हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ओमकार प्रमोद मोरे (वय २३), अरूण अनिल यादव (वय २०), आदित्य ज्ञानेश्वर पिंपळेकर (वय २१) दत्ता वेंकट गीते (वय २०) यांना तात्काळ हालचाली करीत अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदित्य प्रकाश कांबळे याच्यासह आणखी एक आरोपी मात्र फरार झाला आहे.






