उंब्रजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ (फोटो- टीम नवराष्ट्र)
उंब्रज येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
पाटण तिकाटणे परिसरात सोमवारी फोडली 6 दुकाने
उंब्रज पोलिसांसमोर उभे राहिले आहे मोठे आव्हान
उंब्रज: कराड तालुक्यातील उंब्रज येथे चोरट्यांचाधुमाकूळ सुरूच असून पाटण तिकाटणे परिसरात सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली. पहाटे एक ते दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी सुमारे तासभर या परिसरात वावरत दुकाने फोडून रोख रक्कम, मोबाईल अॅक्सेसरीज व इतर साहित्य लंपास (Crime News) केले. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून उंब्रज पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज-कराड महामार्गलगत असलेल्या पाटण तिकाटणे परिसरात चोरट्यांनी प्रथम ओम मेडिकलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. किशोर शिंदे यांच्या मालकीच्या या दुकानातून सुमारे दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. त्यानंतर शेजारील प्रणव माने यांच्या सिद्धनाथ मेडिकलचे दोन कुलूप तोडून शटर उघडण्यात आले. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करत चोरट्यांनी तीन ते चार हजार रुपयांची चिल्लर तसेच काही किरकोळ साहित्य चोरून नेले.
याच परिसरातील अवी रजपूत यांच्या मालकीच्या जी मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून मोबाईल अॅक्सेसरीज व काही मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. तर शेजारील श्री गजानन मेडिकलचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र त्यात ते अपयशी ठरले. तसेच रुद्र पान शॉप आणि पायोनियर मेडिकलचीही कुलपे तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बेपत्ता विद्यार्थिनीचा विहिरीत सापडला मृतदेह; बारामती तालुक्यात खळबळ
दरम्यान या संपूर्ण घटनेदरम्यान तिघे चोरटे परिसरात वावरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. विशेष म्हणजे, पाटण तिकाटणे परिसरात पूर्वी पोलिसांची नियमित रात्रगस्त असायची; मात्र अलीकडे ती बंद झाल्याने चोरट्यांनी याचाच फायदा घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
बेपत्ता विद्यार्थिनीचा विहिरीत सापडला मृतदेह
शारदानगर (ता. बारामती) येथील २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह माळेगाव खुर्द–केव्हिके रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा दत्तात्रय मेमाणे (ह.मु. शारदानगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा मेमाणे ही शिक्षण घेत असलेली तरुणी असून, ९ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. मात्र दिवसभर उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. ओळखीच्या ठिकाणी चौकशी तसेच मित्रमैत्रिणींशी संपर्क साधूनही तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर तिचे वडील दत्तात्रय नामदेव मेमाणे (रा. शारदानगर) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली






