Photo Credit- Social Media
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाबाबत एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वी रचण्यात आल्याची माहिती आता पोलिस तपासात उघड झाली आहे. एवढेच नाही तर, आरोपींनी गेल्या किंत्येक दिवसांपासून बाबा यांच्या घरी ये-जा करत होते. गोळीबार करणाऱ्याने केवळ 2 लाख रुपयांसाठी हा गुन्हा करण्यास तयार केल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. या हत्येसाठी चारही शूटर्सना प्रत्येकी 50 हजार रुपये मिळाले होते. शूटर्स सोशल मीडिया मेसेजिंग ॲप्सद्वारे एकमेकांशी बोलत होते.
या हायप्रोफाईल हत्येचे संपूर्ण नियोजन पुण्यातच केल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासातून समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, नेमबाज गुरमेल सिंग आणि धरमराज कश्यप यांनी युट्यूबवरून शुटींग ( नेमबाजी) प्रशिक्षण घेतले होते. अनेकदा ते थेट शुटिंगचाही सराव करत होते. या हल्लेखोरांना एक छायाचित्र आणि लक्ष्य ओळखण्यासाठी एक ‘फ्लेक्स बॅनर’ देखील देण्यात आला होता.
हेही वाचा:‘त्यावेळी आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले, आता…’; अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना जागा दाखवली
मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीने गुन्ह्यासाठी आर्थिक मदत आणि शस्त्रे पुरवली होती. मुंबई न्यायालयाने मंगळवारी चौथा आरोपी हरीशकुमार निषाद याला 21 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. निषादला मंगळवारीच उत्तर प्रदेशातील बहराइच येथून अटक करण्यात आली.
तर त्यापूर्वी पोलिसांनी कथित शूटर आणि हरियाणाचा रहिवासी गुरमेल बलजीत सिंग, उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्र्मला राज राजेश कश्यप आणि त्यांचे ‘सहकारी’ प्रवीण लोणकर यांना पुण्यातून अटक केली होती. या सर्वांना 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या रिमांड सुनावणीदरम्यान निषाद आणि कश्यप आणि वॉन्टेड आरोपी शिवकुमार गौतम हे एकाच गावचे असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
हेही वाचा: अभ्यासापासून खेळण्यापर्यंत AI बदलणार जग, प्रत्येक कामात होणार हस्तक्षेप
निषाद हा पुण्यात भंगाराचे दुकान चालवत असे आणि गौतमच्या ठावठिकाणाबाबत अधिक तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. निषादचे वकील अजय दुबे यांनी रिमांड याचिकेला विरोध करताना म्हटले की, आरोपी हा परिस्थितीचा बळी आहे आणि त्याला बळीचा बकरा बनवले जात आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांना शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे भागातील खेर नगरमध्ये आमदार मुलगा जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन जणांनी घेरले आणि गोळ्या झाडल्या. बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा: राज्यात पावसाचा जोर कायम; ‘या’ पाच जिल्ह्यांना सलग चार दिवस ‘यलो अलर्ट’, पुण्यासह