वादातून तरुणाचा खून (फोटो- istockphoto)
दारूच्या नशेत तिघांमध्ये किरकोळ वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूप हिंसक भांडणात बदलले. या भांडणादरम्यान समीर शेख आणि प्रथमेश दळवी यांनी अविनाश लोंढे याला दगडाने जबर मारहाण केली. या हल्ल्यात अविनाश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचार मिळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर दोघांनाही आपल्या कृत्याची जाणीव झाली. त्यांनी स्वतःहून बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ दोघांनाही ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.दारूच्या नशेमुळे झालेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान मयत युवक हा अनुसूचित जातीचा असून, त्याच्या खून प्रकरणी खानच्या गुन्ह्यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड करत आहेत. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
चॉकलेट दिलं आणि चिमुकलीवर अत्याचार करून केली हत्या
पुणे जिल्ह्यातील उरसे गाव एक भयानक घटनेने हादरल आहे. ते म्हणजे पुण्याजवळील गावात एका नराधमाने एका छोट्याशा चिमुकलीवर अत्याचार केल आणि तिच्याच पँट ने तिचा गळा आवळत खून केला. या घटनेने पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील आई वडील कामावर जातात. घरात कोणी ही नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर सहा वर्षाच्या मुलीला त्याने चॉकलेट देण्याच आमिष दाखवलं आणि अर्धा किलोमीटर लांब घेवून जात कोणी नाही अशा ठिकाणी अत्याचार केला आणि तिच्या पँट ने गळा आवळत खून केला आहे.






