हृदयद्रावक! कार ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणाने चार जणांना चिरडलं; १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू
भंडारा शहरातून दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना समोर येत आहे. पहिल्या घटनेत तिघांचा तर दुसऱ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत दुचाकीवरून नागपूरकडून भंडाऱ्याकडं येत असलेल्या अज्ञात वाहनासोबत झालेल्या भीषण धडकेत तिघांचा मृत्य झाला आहे. भंडारा शहरालगत असलेल्या टाकली खमाटा येथील हे तिघेही एकाचं दुचाकीवरून मध्यरात्री भंडाऱ्याकडे येत असताना हा भीषण अपघात झाला. यात दोघांनाच घटनास्थळी मृत्यू झाला तर एका तरुणाचा उपचारादरम्यान नागपुरात मृत्यू झाला.
पुढे आलेल्या माहितीनुसार, आदित्य भुरे ( वय 19 वर्ष), सिमोल भुरे (वय 22 वर्ष) आणि किरण केवट (वय 23 वर्ष) असे अपघातात मृत पावलेल्यांची नवे आहेत. भांडाराच्या मौदाजवळ हा अपघात झाला आहे. तिघेही एकाच गावाचे रहिवाशी आहे. या घटनेने गावातील लोकांवर शोककळा पसरली आहे.
दुसऱ्या अपघातात दोघांचा मृत्यू
दुसऱ्या अपघाताच्या घटनेत डस्टर कार चालकानं दुचाकीस्वार दोघांना चिरडलं आहे. राष्ट्रीय महामार्गावरील साकोलीच्या फाट्यावर ही घटना घाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ऑटोतील प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गालागत उतरविल्यानंतर चालकानं ऑटो महामार्गावर वळविला. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांची ऑटोला जबर धडक बसली आणि दोघेही महामार्गावर कोसळले. यादरम्यान पाठीमागून भरधाव आलेल्या डस्टर कार चालकांनं महामार्गावर कोसळलेल्या दुचाकीस्वार दोघांनाही बेदरकारपणे चिरडलं. हा भीषण अपघात नागपूर-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या उकारा फाट्यावर घडली.
मृतकाचे नाव यादवराव वघारे (वय 36) आणि जितेंद्र उपराडे (वय 28) असं आहे. मृतक दोघेही गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील असून ते नागपूरला रोजगाराच्या शोधात निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली.याप्रकरणी साकोली पोलिसांनी ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देवदर्शनास जाताना भीषण अपघात; 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यू तर 7 जण गंभीर