रिक्षा चालकांमध्ये हाणामारी (फोत- istockphoto)
पिंपरी: रिक्षा चालक त्याची रिक्षा घेऊन थांबला असताना दुसरा रिक्षा चालक त्याची रिक्षा घेऊन आला व समोर रिक्षा थांबवून प्रवासी घेऊ लागला. त्याला विरोध केला असता नंतर आलेल्या रिक्षा चालकाने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून अगोदर पासून थांबलेल्या रिक्षा चालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. ६) सायंकाळी साडेसात वाजता तळेगाव चौक, चाकण येथे घडली.
हुसेन अजित शेख (वय ३१, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज लोखंडे, मंगेश लोखंडे, किरण शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे त्यांची रिक्षा घेऊन चाकण येथील तळेगाव चौकात थांबले होते. तिथे आरोपी मनोज लोखंडे त्याची रिक्षा घेऊन आला. त्याने शेख यांच्या रिक्षाच्या समोर रिक्षा उभी केली आणि प्रवाशांना रिक्षात बसवू लागला. त्यामुळे शेख यांनी मनोज याला विरोध केला असता त्याने त्याच्या दोन साथीदारांना बोलावून शेख यांना लाथाबुक्क्यांनी आणि दांडक्याने मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
पुण्यात तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण
पुण्यात गुन्हेगारी वाढली असून, यामुळे पोलिसही अॅक्शन मोडवर आले आहे. पोलिसांकडून दररोज वेगवेगळ्या प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. व्यसनमुक्ती केंद्रात भावाला दाखल केल्यानंतर फीसाठीचे पैसे परत न केल्याने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
सिंहगड रोडवरील धायरी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ पवार (रा. गारमाळ, रायकरनगर, धायरी), कार्तिक उर्फ पप्पू बाळकृष्ण लोणारे (रा. लोणारे वस्ती, धायरी), बबलू कसाळे (रा. धायरी) यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूरज अरुण गायकवाड (वय ३०, रा. लोणारे वस्ती, धायरी) याने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पुण्यात तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर
पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज गायकवाड याचा भाऊ आकाश याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याला सिद्धार्थ पवार याचे सिंहगड रस्त्यावरील खानापूर परिसरात व्यसनमुक्ती केंद्र आहे. व्यसनमुक्ती केंद्रात आकाश याला १५ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. दहा दिवसांसाठी चार हजार रुपये आणि ने-आण करण्यासाठी एक हजार रुपये असे पाच हजार रुपये सिद्धार्थ पवार याला द्यायचे ठरले होते. ३१ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सूरज गायकवाड धायरीतील उंबऱ्या गणपती चौकातून निघाला होता. त्या वेळी तेथील एका दुकानासमोर सिद्धार्थ पवार, कार्तिक लोणारे, बबलू कसाळे थांबले होते. त्या वेळी त्यांनी सूरज याच्याकडे व्यसनमुक्ती केंद्राची फी मागितली. तेव्हा त्याने माझ्याकडे पैसे नसल्याचे त्यांना सांगितले. त्या वेळी तिघांनी त्याला रस्त्यात मारहाण करण्यास सुरुवात केली.