उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षाच्या चिमुकलीला कुराण शिकवण्यासाठी तिच्या मावशीने आपल्या घरी नेले होते. मात्र, तिची मावशी तिच्याकडून नोकरासारखे घरातील सर्व कामे करून घ्याची. एवढाच नव्हे तर किरकोळ चुकांसाठी तिला बेदम मारहाण करायची. आरोपी मावशीने तिची हत्या केली असून तिला अटक केली आहे.
डोंबिवलीत क्रूर कृत्य; सख्या भावानेच केला बहिणीवर लैगिंक अत्याचार; तब्बल १० वर्षांनी सुनावली शिक्षा
मृत मुलगी उत्तर प्रदेशच्या सीतापूर येथील महमूदाबाद बिलासपूर येथील रहिवासी शमशुद्दीनची मुलगी आहे. शमशुद्दीन हा मजूर आहे. तीन महिन्यापूर्वी इंदिरानगरच्या चंदन गावातील रहिवासी असलेल्या शमशुद्दीनची मेहुणी रुबिना इन त्याच्या सहा वर्षाची मुलगी आयशाला आपल्या सोबत घेऊन गेली. तिने
आयशाला कुराण शिकवणार असं शमशुद्दीला म्हंटल होत. ८ जून रोजी सकाळी रुबिनाने शमशुद्दीनला फोन करून आयशाची मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु माहिती मिळताच शमशुद्दीन त्याच्या कुटुंबासह रुबिनाच्या घरी पोहोचला. रुबिनानेआयशाच्या मृत्यूबद्दल तिच्या घरच्यांना काही सांगितले नाही. तिने फक्त गाडीची व्यवस्था केली आणि आयशाचा मृतदेह शमशुद्दीनसोबत पाठवून दिला.
शमशुद्दीन मृतदेह गावात घेऊन पोहोचकला. तो पोहोचल्यानंतर कुटुंबीय आयशाच्या अंतिम संस्काराची तयारी करतांना तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळल्या. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोस्टमार्टमध्ये मुलीचा मृत्यू डोक्याला दुखापत झाल्यामुळे निष्पन्न झाले. मुलीच्या शरीरावर सहा वेगवेगळ्या खुणा आढळल्या. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर, मुलीच्या वडिलांनी इंदिरानगर पोलिसांकडे जाऊन या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ताबडतोब आरोपी रुबीनाला अटक केली आहे.
आयशच्या कुटुंबीयांचा आरोप
आयशाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की , रुबिनाने कुराण शिकवण्याच्या नावाखाली आयशाला सोबत नेले होते. . पण ती आयशाला नोकरासारखे घरातील कामे करायला लावायची. इतकेच नाही तर मुलीला किरकोळ चुकांसाठीही मारहाण देखील करायची. दरम्यान, पोलिसांनी आयशाला ज्या काठीने मारहाण केली, ती काठी देखील जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
१६ वर्षीय विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न; कर्कटकाने रिक्षा चालकावर हल्ला
भिवंडी येथील एका शाळेच्या विद्यार्थिनीच्या रिक्षा चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनीने स्वरक्षणासाठी दप्तरातील कर्कटकचा वापर करुन रिक्षा चालकावर हल्ला केला. त्यानांतर रिक्षातून बाहेर उडी मारत स्वतःचा जीव वाचवला.
Nashik Crime : GST कर्मचाऱ्याकडून सव्वा कोटींची फसवणूक; मानसिक तणावातून एकाने उचलले टोकाचे पाऊल