नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जीएसटी (GST) विभागातील एका कर्मचाऱ्याने एकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यामुळे मानसिक तणावातून एकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे धक्कदायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नावप्रविण सोनावणे आहे. यांनी त्यांच्या मामेभावाच्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे.
१६ वर्षीय विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न; कर्कटकाने रिक्षा चालकावर हल्ला करून वाचवला जीव
नेमकं काय प्रकार?
स्वतःच्या मुलांसह नातेवाईकांच्या मुलांना नोकरी लावून देण्यासाठी संशयित सचिन चिखले याला प्रवीण सोनवणे यांनी तब्बल सव्वा कोटी रुपये दिले. याला दोन वर्ष उलटले, परंतु नोकरी आणि पैसे परातीत मिळाले नाही. प्रवीण सोनवणे यांनी मानसिक तणावातून मामेभावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी प्रवीण सोनवणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. माझ्या आत्महत्येस सचिन चिखले हे जबाबदार आहेत, असा मजकूर देखील त्यांनी चिठ्ठीत लिहिला आहे. याच मानसिक तणावातून प्रवीण सोनवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सध्या सचिन चिखले हा फरार असून नाशिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सचिन चिखले हा जीएसटी विभागात कर्मचारी असल्याची माहिती आहे. त्याचा शोध नाशिक पोलीस घेत आहे. सचिन चिखले यांने प्रवीण सोनावणे सह आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. आत्महत्येपूर्वी प्रवीण सोनावणे यांनी लिहिलेली चिठ्ठी आणि त्यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
बनावट तणनाशक बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 6 जणांना घतले ताब्यात
बनावट तणनाशक तयार करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करंजे नाका येथे आठ जुलै रोजी दुपारी चार वाजता सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. शाहूपुरी पोलिसांची ही अत्यंत महत्वाची कारवाई मानली जात आहे. २ लाख ६ हजाराच्या बायर कंपनीच्या बनावट औषधाच्या २६० बॉटल, १ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो, रेवडी, फलटण व वडूज येथील कारखान्यातून तब्बल १२ लाखाची बनावट राऊंडअप औषधे जप्त केली आहेत.
धैर्यशील अनिल घाडगे (वय ३१ रा, साई वैष्णव अपार्टमेंट, समता कॉलनी शाहूपुरी), युवराज लक्ष्मण मोरे (वय २८, रेवडी, ता. कोरेगाव), गणेश मधुकर कोलवडकर (वय ३०, रा. घालवड, ता. फलटण, जि. सातारा), नीलेश भगवान खरात (वय ३८, रा. जाधववाडी, ता. फलटण), तेजस बाळासो ठोंबरे (वय ३०, रा. वडूज तालुका खटाव), संतोष जालिंदर माने (वय ४५, रा. नढवळ, ताल. खटाव, जि. सातारा) या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय ढमाळ अधिक तपास करत आहेत.
हडपसर, खडकीत पोलिसांची मोठी कारवाई; 21 किलो गांजा, तीन किलो दोडाचुरा जप्त