TEASED (फोटो सौजन्य - PINTERSET)
पुण्याला विद्येचे माहेरघर असं म्हंटल जात. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत अत्याचाराचाच्या हत्येच्या घटना समोर येतांना पाहायला मिळत आहे. अश्यातच मुलीची छेड काढून तिला अर्धा तास लिफ्टमध्ये डांबून ठेवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील शिक्षण क्षेत्रातील दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील कात्रज गोकुळनगर येथील टाकळकर क्लासेसमध्ये घडली. येथे परप्रांतीय कर्मचाऱ्याकडून मुलीची छेड काढून तिला अर्धा तास लिफ्टमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
मनसे स्टाईलने दिला चोप
मुलीची छेड काढून तिला अर्धा तास लिफ्टमध्ये डांबून ठेवणाऱ्या परप्रांतीयाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांनी माणसे स्टाईलने चोप दिला आहे. सदर विषयाची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला धडा शिकवला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये एका परप्रांतीय तरुणाने विद्यार्थिनीची छेड काढल्याची धक्कादायक घटना घडली. छेड काढल्यानंतर या तरुणाने या मुलीला अर्धा तास लिफ्टमध्ये डांबून ठेवलं होतं. या घटनेची माहिती मिळताच मनसैनिकांनी या परप्रांतीय तरुणाला चांगलाच चोप (Pune Crime News) दिला. परप्रांतीयाने विद्यार्थिनीची छेड काढल्याची माहिती मिळाल्यानंतर मनसैनिकांनी क्लासेसमध्ये धाव घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांनी या परप्रांतीय तरुणाला जाब विचारत त्याला चोप दिला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
परप्रांतीयाकडून मुलीची छेड काढून लिफ्टमध्ये अर्धा तास डांबून ठेवल्याने सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Crime News : संतापजनक! आजोबा पैशासाठी बनले राक्षस , 5 हजार रुपयांसाठी विकले नातीला