सध्या सगळीकडे सोशल मीडियाची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियाच्या अधीन गेले आहेत. सोशल मीडियाचा जितका चांगला वापर केला जातो तितकाच दुरुपयोग देखील केला जात आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये घडली आहे. पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणात पत्नीने सोशल मीडियाचा वापर करून पतीला मारण्याची सुपारी दिली. पत्नीने एवढंच न करता व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत पतीला मारणाऱ्या व्यक्तीला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यानंतर पतीने हा स्टेट्स पहिला आणि मदतीसाठी थेट पोलिसात जाऊन धाव घेतली.
धमकीचा स्टेटस पाहिल्यानंतर पतीने पोलिसात जाऊन मदत मागितली. तर पीडित पतीने पत्नीवर मित्राला सुपारी दिल्याचा आरोप केला. हा धकादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील बह पोलीस स्टेशनच्या परिसरात घडला. त्यानंतर पीडित व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये जात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. ९ जुलै २०२२ मध्ये मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका तरुणीशी पिडीताने लग्न केले. त्यानंतर दोघांमध्ये अनेक मतभेद,वाद सुरु झाले. त्यानंतर त्याच वर्षी भांडण झाल्यावर पत्नी भिंडमध्ये निघून गेली.तर पत्नीने भिंड न्यायालयात भरणपोषणाचा दावा पती विरुद्ध दाखल केला. दावा दाखल केल्यानंतर पतीला भिंड येथे न्यायालयात तारखेसाठी जावे लागले.
त्यानंतर २० डिसेंबर २०२३ रोजी न्यायालयातून घरी परतत असताना पत्नीच्या माहेरच्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. हे सर्व चालू असतानाच पत्नीने पतीला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली. काल पत्नीने तिच्या व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. एवढाच नसून तिने असे सांगितले की, माझ्या इच्छेविरुद्ध लग्न झाले आहे. जो कोणी माझ्या पतीची हत्या करेल त्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे व्हाट्सअप स्टेटस वर लिहिले.
हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशातील भिंडमध्ये घडला आहे. या संपूर्ण घटनेप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ च्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडिताची पत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.