एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि तिच्या प्रियकरावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केल्याचे समोर आले आहे. पत्नीने पतीचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि त्याला ब्लॅकमेलिंग देखील केल्याचे समोर आले आहे. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे.
स्योहारा परिसरात एका गावात या व्यक्तीचं लग्न सुमारे दहा वर्षांपूर्वी कोतवाली देहात परिसरातील एका तरुणाशी झालं होत. या दाम्पत्याला चार मुले देखील आहेत. पती गेल्या दीड वर्षांपासून मुरादाबादमध्ये भाड्याच्या घरात राहत दुकान चालवत होता. तो महिन्यातून एकदा किंवा दोनदा घरी यायचा, जेणेकरून मुलं आणि पत्नीला भेट येईल. पण गेल्या एका वर्षांपासून पत्नीचं वागणं अचानक बदललं. त्यांच्यात सतत भांडण होत होते. पतीला संशय आला की पत्नीचं दुसऱ्या कोणाशीतरी अनैतिक संबंध आहे. त्याने तपास करायला सुरुवात केली तेव्हा त्याचा संशय खरा ठरला.
आपल्याच पत्नीच्या प्रियकराच्या खात्यात पाठवले पैसे
पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून घरातून सुमारे अडीच लाख रुपयांचे सामान लंपास केले. ते सर्व सामान तिच्या प्रियकराला दिला. जेव्हा पतीने याचा विरोध केला तेव्हा पत्नीने त्याला धमकावण्यास सुरुवात केली. पतीच्या म्हणण्यानुसार, पत्नीने त्याचा अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली आणि पैश्याची मागणी केली. सामाजिक बदनामीच्या भीतीने त्याने नाईलाजाने आपल्याच पत्नीच्या प्रियकराच्या खात्यात ११००० रुपये पाठवले.
ऑडिओ रेकॉर्डिंगने पायाखालची जमीनच सरकली
काही दिवसानंतर पतीला पत्नीच्या मोबाईलमध्ये एक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडली, ज्यामध्ये पत्नी आणि तिचा प्रियकर मिळून त्याच्या हत्येचा कट रचत होते. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर पीडित व्यक्तीने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरण नोंदवून घेतलं असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
नातवाला वाचवताना आजोबांचा मृत्यू; चंद्रपूरच्या कालव्यात दोघेही वाहून गेले
चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कालव्यात पडलेल्या नातवाला वाचवतांना आजोबाही वाहून गेल्याची दुःखद घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्यासाधे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हिरापूर येथील घटना आहे. रोहित गोरंतवार आणि भगवानदास लाटेलवार असे वाहून गेलेल्या नातू आणि आजोबाच नाव आहे. शनिवारी हे दोघे बकऱ्यांचा चारा आणण्यासाठी आसोलामेंढा तलावाच्या परिसरात गेले होते. झाडावर चढून पाला तोडताना नातवाचा तोल गेला आणि तो आसोलामेंढाच्या कालव्यात पडला. हे पाहताच आजोबाने नातवाला वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली मात्र पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले.
पुण्यात गुंडाराज ! मार्केटयार्ड भागात पोलिसावरच हल्ला, लोखंडी कड्याने डोळ्यावर…