Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
Maharashtra to World Breaking News: अमेरिकेने भारतावरील कर २५% वरून १८% पर्यंत कमी केले आहेत. पंतप्रधान मोदींशी बोलल्यानंतर काही वेळातच, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथसोशियलवर पोस्ट करत भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची घोषणा केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि सांगितले की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही.
अमेरिकेच्या अध्यक्षांनी पुढे म्हटले की भारत आता व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करेल. दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांचा कॉल झाला आणि त्यानंतर ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर ही पोस्ट शेअर केली असल्याचे दिसून येत आहे. भारतासाठी ही नक्कीच मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. नुकतेच बजेट झाले असून व्यवसायाच्या दृष्टीने हे नक्कीच महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
03 Feb 2026 06:58 PM (IST)
नवी दिल्ली : भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरु असलेल्या निर्मितीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या हाय-स्पीड रेल कॉरिडॉरमधील पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड येथील पर्वतीय बोगद्याचे (माउंटन टनल-6) खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कामाची पाहणी केली.
03 Feb 2026 06:43 PM (IST)
मुंबई, दि. ३: वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरात औद्योगिकरण वाढत आहे. नागरीकरणाचा वेगही गतिमान आहे, अशा परिस्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
03 Feb 2026 06:20 PM (IST)
इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) या जगातील आघाडीच्या स्वतंत्र डायमंड ग्रेडिंग आणि सर्टिफिकेशन संस्थेने अमेरिकन जेमोलॉजिकल लॅबोरेटरीज (AGL) या रंगीत रत्नांच्या विश्लेषण व ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ अहवालांसाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेचे संपादन केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण व्यवहारामुळे आयजीआयची व्यापक जागतिक उपस्थिती आणि एजीएलची सखोल वैज्ञानिक तज्ज्ञता एकत्र येत असून, जागतिक हिरा व ज्वेलरी उद्योगात सर्टिफिकेशनच्या क्षेत्रात एक मजबूत, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज असा प्लॅटफॉर्म उभा राहणार आहे.
03 Feb 2026 06:04 PM (IST)
भारत सरकारने रविवारी २०२६ साठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली, ज्यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री श्रेणी अंतर्गत १३१ नागरी सन्मानांना मान्यता देण्यात आली. या यादीत सार्वजनिक जीवन, कला, चित्रपट, साहित्य, क्रीडा आणि सार्वजनिक कल्याणातील अनेक प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला देखील भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यावर आता रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
03 Feb 2026 05:50 PM (IST)
मनोरंजन विश्वात अनेक कलाकार आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहेत. अलिकडेच विशाल निकम, ज्ञानदा रामर्तीर्थकर, गायत्री दातार, रेवली लेले या कलाकारांपाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने प्रेमाची कबुली दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे, अपूर्वा गोरे आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत हे सांगितले आहे. लवकरच अपूर्वा लग्न बंधणात अडकणार आहे.
03 Feb 2026 05:40 PM (IST)
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांनी तंत्रज्ञान आणि अवकाशाच्या जगात एक धाडसी पाऊल उचलले आहे. मस्क यांनी त्यांची अंतराळ संशोधन कंपनी, स्पेसएक्स आणि त्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी, एक्स-एआय यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे धोरणात्मक पाऊल मस्कची तांत्रिक ताकद आणखी मजबूत करण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी आहे. या विलीनीकरणाद्वारे, मस्क ‘सुपर टेक आयपीओ’ ची तयारी करत आहेत, जो या वर्षाच्या अखेरीस बाजारात येऊ शकतो.
03 Feb 2026 05:35 PM (IST)
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान आज पुन्हा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना झालेल्या गोंधळादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी थेट टेबलांवर चढून सभापतींच्या व्यासपीठावर कागदपत्रे फेकली. कागदपत्रे फेकणाऱ्या सर्व विरोधी खासदारांवर सभापती ओम बिर्ला यांनी कडक कारवाई केली आहे. सभापतींनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी आठ विरोधी खासदारांना निलंबित केले आहे. हे सर्व खासदार आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत. निलंबित केलेले खासदार काँग्रेस आणि सीपीएमचे आहेत.
03 Feb 2026 05:30 PM (IST)
दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना संपूर्ण देशातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. विविध ठिकाणी शोकसभांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये देखील अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्याबाबत देखील भाष्य केले आहे. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी मनसे नेते राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) टीकेवर प्रत्युत्तर दिले.
03 Feb 2026 05:20 PM (IST)
परदेशातील बाली, थायलंडलाही मागे टाकेल असे पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून समोर येऊ लागले आहे. किनाऱ्यापासून जवळपास १६ किलोमीटरवर असणान्या वेंगुले तालुक्यातील निवती लाईट हाऊससह आठ सौंदर्य स्थळे चांगलीच प्रसिद्ध होत आहेत. मागील आठवड्यातील तीन दिवसात तब्बल ५ हजाराहून अधिक पर्यटकांनी भुरळ पडालेले हे सौंदर्य पाहण्याचा आनंद घेतला आहे. याबाबतची माहिती मेढ़ा ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला मागील दोन-तीन वर्षांमध्ये वेगळीच गती मिळाली आहे. देशाच्या पर्यटन नकाशावर प्रसिद्ध असणाऱ्या मालवण तालुक्यातील पर्यटनाबरोबरच वेंगुले आणि देवगड मधील गड किल्ले, समुद्र पर्यटन, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक विविध ठेवा पाहण्यासाठी देशी विदेशी पर्यटक जिल्ह्यात आवर्जून भेटी देत आहेत.
03 Feb 2026 05:15 PM (IST)
वाळूज येथील बजाजनगर परिसरातील शिवछत्रपती विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ १ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत “आम्ही कॉपी करणार नाही” अशी ठाम प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कवी व लेखक संतोष विरकर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
03 Feb 2026 05:10 PM (IST)
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत असून राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षच अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जिल्ह्यात विविध गटांमध्ये थेट लढती होत असून काही अपवाद वगळता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असले तरी स्थानिक पातळीवरील समीकरणांमुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीऐवजी थेट संघर्ष रंगला आहे. एकूणच, रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा बहुरंगी आणि बहुकोनी लढती होत असून मतदार कोणाच्या पारड्यात मतांचा कौल टाकतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांमध्ये प्रचाराची रणधुमाळी अधिक तीव्र होणार असून स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि वैयक्तिक संपर्क हेच विजयाचे प्रमुख सूत्र ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
03 Feb 2026 05:05 PM (IST)
बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द फिल्म’ने अखेर आपल्या शूटिंगचा शेवटचा टप्पा पूर्ण केला आहे. भारतातील सर्वात गाजलेल्या क्राइम फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘मिर्झापूर’च्या प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जात आहे. लोकप्रिय वेब सिरीजवर आधारित हा चित्रपट 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून, मिर्झापूरच्या अंधाऱ्या आणि धक्कादायक विश्वाला यावेळी अधिक भव्य आणि सिनेमॅटिक स्वरूप मिळणार आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मज्जा येणार आहे.
03 Feb 2026 04:55 PM (IST)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला २३ हजार ९२६ कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबई पुणे व पुणे ते हैदराबाद अशा दोन बुलेट ट्रेनचा समावेश असणार आहे. पुणे मुंबई प्रवास ४८ मिनिटांचा असून, पुणे ते हैदराबाद हा प्रवास १ तास ५५ मिनिटांचा असणार आहे. ५ मिनिटांचा सोलापूरला थांबा मिळाल्यास ही हायस्पीड ट्रेन पुढे हैदराबादला पोहोचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. या हायस्पीड ट्रेनचा आयटी इंजिनिअर्स, उद्योजक, व्यापारी व इतर सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या २६ कोटी महाराष्ट्राला आहेत प्रमाणात होणार आहे. अर्थसंकल्पात तरतूद झालेल्या पुणे-हैदराबाद हायस्पीड ट्रेन सोलापूर मार्गे धावणार आहे. या ट्रेनला सोलापुरात थांबा मिळाल्यास सोलापूर हैदराबाद रेल्वे प्रवास एक तासाचा होईल, अशी शक्यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोलापूर विभागातील काही रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
03 Feb 2026 04:45 PM (IST)
वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाचे पालन न करणाऱ्या नवी मुंबईतील ७ बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामांमुळे होणारे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व ब्लास्टिंगसंदर्भातील मानक कार्यपद्धती (SOP) तसेच प्रदूषण नियंत्रणासाठीच्या दंडात्मक कारवाईचे नियम संबंधित विकासक व बांधकाम धारकांना यापूर्वीच कळविण्यात आले होते. आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्ण केल्यानंतरच बांधकाम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच बांधकाम स्थळाच्या आजूबाजूच्या ५०० मीटर परिसरात व रस्त्यांवर धूळ प्रदूषण होऊ नये, यासाठी काटेकोर देखरेख करण्याचे आदेश देण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन झाल्यास काम तात्काळ बंद (Stop Work) करण्याचा इशाराही नोटीसद्वारे देण्यात आला होता. या सूचनांचे पालन न करणारी ७ बांधकामे आज सील करण्यात आली आहेत.
03 Feb 2026 04:35 PM (IST)
डब्ल्यू जे प्रकरणातील आरोपी संकेश घाग याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आज त्याला चिपळूण येथील न्यायालय आणण्यात आले होते यावेळी त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र सदरच्या आरोपीला पोलिसांनी आपल्यासोबत एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते यावेळी त्यांच्या हातात साध्या बेड्या पण घालण्यात आल्या नव्हता त्याला एक 'व्हीआयपी' ट्रीटमेंट देऊन जेवण देण्यात आले त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे "
03 Feb 2026 04:25 PM (IST)
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत असून राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षच अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जिल्ह्यात विविध गटांमध्ये थेट लढती होत असून काही अपवाद वगळता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असले तरी स्थानिक पातळीवरील समीकरणांमुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीऐवजी थेट संघर्ष रंगला आहे. एकूणच, रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा बहुरंगी आणि बहुकोनी लढती होत असून मतदार कोणाच्या पारड्यात मतांचा कौल टाकतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांमध्ये प्रचाराची रणधुमाळी अधिक तीव्र होणार असून स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि वैयक्तिक संपर्क हेच विजयाचे प्रमुख सूत्र ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
03 Feb 2026 04:15 PM (IST)
वाळूज येथील बजाजनगर परिसरातील शिवछत्रपती विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ १ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत “आम्ही कॉपी करणार नाही” अशी ठाम प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कवी व लेखक संतोष विरकर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
03 Feb 2026 04:08 PM (IST)
कोकणातील पर्यावरण आणि स्थानिकजनतेच्या भावना लक्षात घेता, लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी उद्योग प्रकल्प चिपळूणसह कोकणात सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असे मोठे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.चिपळूण येथे आयोजित महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा स्पष्ट इशारा दिल्याने कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोकण हे निसर्गसंपन्न आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. येथे उद्योग विकास आवश्यक असला तरी तो पर्यावरणपूरक आणि स्थानिकांच्या हिताचा असला पाहिजे. प्रदूषण वाढवणारे प्रकल्प मंजूर करून कोकणच्या आरोग्यावर आणि शेती-मत्स्यव्यवसायावर परिणाम होणार असेल, तर सरकार ते सहन करणार नाही.लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही काळापासून चिपळूण, खेड, लोटे परिसरात तीव्र विरोध सुरू होता. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या विधानाकडे विशेष महत्त्व दिले जात आहे.
03 Feb 2026 04:00 PM (IST)
Tech News Marathi: आजच्या युगात इंटरनेट हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. माहिती मिळवण्यापासून ते मनोरंजनापर्यंत सर्व गोष्टींसाठी आपण इंटरनेटवर अवलंबून आहोत. कोणत्याही विषयाची माहिती अवघ्या काही सेकंदात गुगल किंवा इतर सर्च इंजिनवर उपलब्ध होते. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ईमेलद्वारे जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी आपण त्वरित संवाद साधू शकतो. याचसंदर्भात एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये देशात इंटरनेट युजर्सची संख्या किती आहे, ही आकडेवारी समोर आली आहे.
03 Feb 2026 03:50 PM (IST)
९० च्या दशकात मल्याळम चित्रपट संगीताचे प्रसिद्ध चेहरा असलेले संगीत दिग्दर्शक एस.पी. वेंकटेश यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आज सकाळी (३ फेब्रुवारी) चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मल्याळम, तमिळ आणि कन्नड भाषेत १५० हून अधिक गाणी लिहिली आहेत. त्यांनी राजविंते माकन, हिटलर, किलुक्कम, मिन्नाराम, स्पादिकम, इंद्रजालम, जॉनी वॉकर, कौरवर, नादोडी, ध्रुवम, गंधर्वम आणि पॅट्रियट यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. “विन्निले गंधर्वम” आणि “सीता कल्याण वैभोगमे” सारख्या गाण्यांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान ठरले आहे.
03 Feb 2026 03:40 PM (IST)
२०२६ चे पहिले सूर्यग्रहण फेब्रुवारीमध्ये होणार आहे. हे एक रिंग सूर्यग्रहण असेल आणि ते अमावस्येच्या दिवशी होईल. ग्रहणासाठी सुतक काळ ग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो. २०२६ चे पहिले सूर्यग्रहण मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि केतू सूर्यग्रहण करतात. तथापि, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जातो तेव्हा सूर्यग्रहण होते. त्या वेळी, चंद्राची सावली सावली पडते, ज्यामुळे सूर्यग्रहण तयार होते. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. २०२६ च्या पहिल्या सूर्यग्रहणाची आणि सुतक काळाची ठिकाणे आपण पाहूया.
03 Feb 2026 03:40 PM (IST)
लसीकरण हे आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. आतापर्यंत आपण लसीकरणाला प्रामुख्याने पोलिओ, गोवर यांसारख्या बालपणी होणाऱ्या आजारांपासून संरक्षण म्हणून पाहिले आहे. मात्र अनेकांना हे माहित नसते की काही लसी कर्करोग होण्याचा धोका कमी करण्यासही मदत करतात. ही माहिती भारतीय कुटुंबांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण योग्य वेळी योग्य लस घेतल्यास भविष्यात कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो आणि दीर्घकाळ आरोग्य चांगले राहू शकते.भारतामध्ये अनेक कर्करोग हे दीर्घकाळ चालणाऱ्या संसर्गामुळे होतात. हे संसर्ग लसीकरणाद्वारे टाळता येऊ शकतात. त्यामुळे कर्करोग प्रतिबंध करणाऱ्या लसींबाबत जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. यामुळे पालकांना त्यांच्या मुलांसाठी, किशोरवयीन मुला-मुलींसाठी तसेच प्रौढांसाठीही योग्य आरोग्यविषयक निर्णय घेता येतात. डॉ. राम पाटील, हेड अँड नेक ऑन्को सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय, पुणे यांनी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
03 Feb 2026 03:35 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने कार भरवेगात व निष्काळजीपणे चालवून गल्लीत उभ्या रिक्षासह दुचाकीला धडक दिली. याशिवाय या घराच्या गेटला जोरदार धडक देत गेटमधील दुचाकीचे देखील नुकसान केले. या घटनेने काहीकाळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना रात्रीच्या सुमारास बारी कॉलनीत घडली. अफजल इक्बाल मर्चड (वय ४०, रा. नाजीया मस्जिद परिसर) असे मद्यधुंद चालकाचे नाव असून, त्याच्याविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. तसेच त्याची कार देखील जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्याचे हवालदार लोभाजी सुक्रे (वय ५२) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे १ जानेवारी रोजी कर्तव्यवार असताना रात्री डायल ११२ वरून रोड अपघाताची माहिती मिळताच फिर्यादीसह त्यांचे सहकारी अंमलदार विलास बकले असे बारी कॉलीनी परिसरात गेले.
03 Feb 2026 03:25 PM (IST)
HDFC Pension Update: भारताची राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएससाठीचा सर्वात मोठा पॉइंट ऑफ प्रेझन्स तसेच खासगी क्षेत्रातील पेन्शन फंड अशी ओळख असलेल्या एचडीएफसी पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेडने अर्बन कंपनी प्लॅटफॉर्मवरील ५०,००० सर्व्हिस पार्टनर्ससाठी ‘नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) प्लॅटफॉर्म वर्कर्स मॉडेल’ अंमलात आणण्यासाठी अर्बन कंपनीबरोबर सहयोग साधला आहे. या उपक्रमामुळे अर्बन कंपनीच्या सेवा व्यावसायिकांना पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (PFRDA)द्वारे विनियमित सेवानिवृत्ती बचत योजनेमध्ये आपले नाव स्वेच्छेने दाखल करणे शक्य होणार आहे. या भागीदारीच्या माध्यमातून सेवा व्यावसायिकांना सुलभीकृत व अखंडित पद्धतीने संरचित नियोजन प्राप्त होऊ शकणार आहे.
03 Feb 2026 03:15 PM (IST)
खोपोली/संतोष पेरणे : अजितदादा पवार यांच्या निधनानंतर शोकसागरात बुडालेले कार्यकर्ते आणि राज्यातील जनता अजूनही दुःखात आहे. अजितदादा यांच्या अस्थी असलेला कलश कर्जत तालुक्यात आल्यानंतर शेकडो नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले.तर आज हा अस्थी कलश फुलांनी सजवलेल्या रथामधून खोपोली येथे नेण्यात आला त्यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार नंतर एकत्रित करण्यात आलेल्या अस्थी यांचे दर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सार्वजनिक केले आहे.रायगड जिल्ह्यासाठी बारामती येथून निघालेला रथ काल कर्जत येथे आला होता.हा अस्थी कलश आज कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
03 Feb 2026 03:05 PM (IST)
नवीन वर्ष २०२६ ची सुरुवात भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगासाठी उत्साहवर्धक ठरली आहे. जानेवारी महिन्यात देशातील अनेक प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांच्या विक्रीत चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, हुंडई आणि टोयोटा यांसारख्या कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वाहनांची विक्री केली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने जानेवारी २०२६ मध्ये एकूण १,०४,३०९ वाहनांची विक्री केली आहे. ही विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २४ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीच्या देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीतही वाढ झाली आहे. जानेवारी २०२६ मध्ये देशांतर्गत विक्री ६३,५१० युनिट्स झाली, तर जानेवारी २०२५ मध्ये ती ५०,६५९ युनिट्स होती. त्यामुळे महिंद्राच्या विक्रीत सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
03 Feb 2026 02:55 PM (IST)
लोणावळा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने लोणावळ्यातील टाइगर पॉइंट येथे 400 फूट खोल दरीत उडी मारत आपलं जीवन संपवल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव श्रेया नरेंद्र पाटील (२०) असे आहे. ३६ तासाच्या शोधानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिने आत्महत्या का केली? याचे कारण समोर आले आहे.
03 Feb 2026 02:50 PM (IST)
कसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रांचा उल्लेख केला. राहुल गांधी या पुस्तकातील काही घटनांचा संदर्भ लोकसभेत मांडणार होते. पण त्यांनी सुरूवात करताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लगेच आक्षेप घेतला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही या पुस्तकातील संदर्भ मांडण्यास नकार दिला. यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी विस्कळीत झाले. २०२० साली भारतीय लष्कर आणि चिनी लष्कराचा मोठा संघर्ष झाला होता. या संघर्षाचे संदर्भ जनरल नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहीले आहेत. हेच संदर्भ राहुल गांधी मांडणार होते.
03 Feb 2026 02:45 PM (IST)
२०२६ अर्थसंकल्पानंतर, सामान्य माणूस, शेअर बाजार आणि अर्थतज्ज्ञांचे लक्ष आता ६ फेब्रुवारीला होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण बैठकीवर लागले आहे. त्या बैठकीपूर्वी, बहुतेक प्रमुख वित्तीय संस्थांचे अर्थतज्ज्ञ एकमत असल्याचे दिसून येते. नोमुरा, सिटी इंडिया, SBI, JP मॉर्गन आणि देशाचे माजी मुख्य सांख्यिकीशास्त्रज्ञ प्रणव सेन यांच्यासह अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की पतधोरण समिती (MPC) रेपो दरात कोणताही बदल करणार नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सध्या महागाईच्या ट्रेंड, रुपयाच्या हालचाली आणि जागतिक परिस्थितीची समजून घेईल.
03 Feb 2026 02:40 PM (IST)
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) अलीकडेच खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव भारतात होणाऱ्या २०२६ च्या पुरुष टी२० विश्वचषकात आपला संघ पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर, आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आणि बांगलादेशला टी२० विश्वचषकातून बाहेर काढले. आता, बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बीसीबी आपल्या महिला क्रिकेटपटूंच्या सुरक्षेबाबत अडचणीत सापडला आहे. महिला क्रिकेटपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये योग्य कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेश उच्च न्यायालयाने बीसीबीला कडक शब्दांत फटकारले आहे.
03 Feb 2026 02:35 PM (IST)
ठाणे येथील एका १८ मजली इमारतीला आज (3 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत ७० हून अधिक लोक अडकले होते आणि त्यांना वाचवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना ठाण्यातील शास्त्री नगरमधील मिलन हिल येथे घडली. आज (मंगळवार) पहाटे ४ वाजताच्या सुमारास एका विजेच्या पाईपमधून ठिणगी पडली आणि क्षणार्धात संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
03 Feb 2026 02:30 PM (IST)
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादात एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या १२ वर्षीय मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने हत्या केल्यानंतर मुलाचा मृतदेह एका पेटीत लपवला त्यानंतर तो तिथून फरार झाला. काय घडलं नेमकं? जाणून घ्या प्रकरण?
03 Feb 2026 02:25 PM (IST)
२०२६ चा सॅमसंगचा सर्वात मोठा लाँच इव्हेंट आता जवळ आला आहे असे मानले जात आहे. नवीन रिपोर्ट्स आणि टिपस्टर लीक्सनुसार, Samsung Galaxy Unpacked हा इव्हेंट 25 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे. या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy S26, S26 Plus आणि S26 Ultra सारखे फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच होण्याची अपेक्षा आहे. त्याच इव्हेंटमध्ये सॅमसंग त्यांचे फ्लॅगशिप इयरफोन, गॅलेक्सी बड्स ४ प्रो देखील लाँच करू शकते. कंपनीने अधिकृत आमंत्रण जारी केलेले नसले तरी, सध्या सुरू असलेल्या लीक्समुळे परिस्थिती स्पष्ट झाली आहे.
03 Feb 2026 02:20 PM (IST)
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘धुरंधर २’ असो किंवा ‘धुरंधर द रिव्हेंज’, या चित्रपटाची झलक पाहून चाहत्यांना आणखी आनंद झाला आहे. परंतु, चित्रपटाला अजूनही संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्याचे दिसून येत आहे. जर तुम्ही टीझर पाहिला असेल, तर तुम्हाला समजेल की धुरंधरचे चाहते या नवीन थरार आणि साहसासाठी का उत्सुक आहेत. दुसऱ्या भागाचा विचार करता, त्यातील प्रत्येक सीनमध्ये दुप्पट अॅक्शन दिसून येणार आहे.
03 Feb 2026 02:15 PM (IST)
Liberty General Insurance: लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेडने अलीकडेच ‘लिबर्टी अशुअर’ नावाचे एक नवीन ॲड-ऑन कव्हर लाँच केले आहे, जे खात्रीशीर सहाय्य आणि जलद, अधिक विश्वासार्ह सेवेद्वारे खाजगी कार मालकीचा अनुभव अधिक चांगला बनवण्यासाठी डिझाइन केले आहे. हे ॲड-ऑन सोयीसुविधा, कमी वेळेचा विलंब आणि सुधारित दुरुस्ती समर्थनावर लक्ष केंद्रित करून लिबर्टीच्या मोटर विमा प्रस्तावाला अधिक मजबूत करते, ज्यामुळे दाव्यांच्या आणि बिघाडाच्या परिस्थितीत ग्राहकांना येणाऱ्या प्रमुख समस्यांचे निराकरण होते.
03 Feb 2026 02:10 PM (IST)
दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा (Pakistan) पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अपमान झाला आहे. मित्र देश रशियानेच पाकिस्तानला फटकारले असून भारत-पाकिस्तान वादात मध्यस्थीसाठी नकार दिला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत-पाकिस्तान वाद (India Pakistan Dispute) हा द्विपक्षीय वाद आहे. तो त्यांनी स्वत:चा सोडवावा. रशियाच्या या उत्तरामुळे पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ यांना चांगला झटका बसला आहे.
03 Feb 2026 02:05 PM (IST)
महिला प्रीमियर लीग (WPL) च्या चौथ्या हंगामाचा एलिमिनेटर सामना आज गुजरात जायंट्स (GG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात खेळला जाईल. हा सामना वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल. टॉस संध्याकाळी ७ वाजता होईल. या सामन्यातील विजेता संघ ५ फेब्रुवारी रोजी वडोदऱ्यात होणाऱ्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करेल. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.
03 Feb 2026 01:55 PM (IST)
क्रीडा मंत्रालय भविष्यात बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमध्ये फॉर्म्युला वन पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहे आणि २०१३ मध्ये भारतात झालेल्या या शर्यतीला पुन्हा सुरू करण्यासाठी ट्रॅक अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले की, क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी गेल्या आठवड्यात ग्रेटर नोएडा येथील ट्रॅकला भेट दिली. त्यांनी यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली, ज्यांनी आता दिवाळखोरीत निघालेल्या ट्रॅक मालक जेपी ग्रुपकडून या संकुलाचा ताबा घेतला.
03 Feb 2026 01:45 PM (IST)
“धुरंधर” च्या प्रचंड यशादरम्यान, रणवीर सिंगच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या पुढील भागाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. दिग्दर्शक आदित्य धर आणि कलाकार रणवीर सिंग, आर. माधवन, सारा अर्जुन आणि इतरांनी टीझर रिलीज होण्याचे संकेत देणाऱ्या इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केल्या आहेत आणि आता “धुरंधर २” चा टीझर रिलीज झाला आहे.
03 Feb 2026 01:40 PM (IST)
२०२६ अर्थसंकल्पानंतर, सामान्य माणूस, शेअर बाजार आणि अर्थतज्ज्ञांचे लक्ष आता ६ फेब्रुवारीला होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण बैठकीवर लागले आहे. त्या बैठकीपूर्वी, बहुतेक प्रमुख वित्तीय संस्थांचे अर्थतज्ज्ञ एकमत असल्याचे दिसून येते. नोमुरा, सिटी इंडिया, SBI, JP मॉर्गन आणि देशाचे माजी मुख्य सांख्यिकीशास्त्रज्ञ प्रणव सेन यांच्यासह अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की पतधोरण समिती (MPC) रेपो दरात कोणताही बदल करणार नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सध्या महागाईच्या ट्रेंड, रुपयाच्या हालचाली आणि जागतिक परिस्थितीची समजून घेईल.
03 Feb 2026 01:35 PM (IST)
भारताच्या व्यापार वर्गासाठी सध्या दिवाळ सण आला आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या व्यापारी करारामुळे भारताला (India America Relations) मोठा फायदा होत आहे. अमेरिका-भारत व्यापार कराराचा एक भाग म्हणून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील १८% कर कपातीची घोषणा केली आहे. यामुळे सत्ताधारी भाजप खासदारांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) हार घालून त्यांचे कौतुक केले.सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे बजेट सादर केले. यानंतर लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ सुरु आहे. यानंतर आता भारत -अमेरिका व्यापार करारामुळे सत्ताधारी नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सत्ताधारी खासदारांनी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी अमेरिकी कराराबाबत अभिनंदन केले आहे.
03 Feb 2026 01:29 PM (IST)
लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रांचा उल्लेख केला. राहुल गांधी या पुस्तकातील काही घटनांचा संदर्भ लोकसभेत मांडणार होते. पण त्यांनी सुरूवात करताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लगेच आक्षेप घेतला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही या पुस्तकातील संदर्भ मांडण्यास नकार दिला. यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी विस्कळीत झाले. २०२० साली भारतीय लष्कर आणि चिनी लष्कराचा मोठा संघर्ष झाला होता. या संघर्षाचे संदर्भ जनरल नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहीले आहेत.
03 Feb 2026 01:25 PM (IST)
बॉलीवूडमधील लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी “गोलमाल” त्याच्या पाचव्या भागासह परत येत आहे आणि यावेळी, चित्रपटात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. अहवालांनुसार, अक्षय कुमार “गोलमाल ५” मध्ये मुख्य खलनायक म्हणून सामील झाला आहे, जो त्याला अजय देवगण आणि त्याच्या टीमविरुद्ध पडद्यावर उभे करेल.मुख्य कलाकारांमध्ये अजय देवगणचा समावेश आहे, जो फ्रँचायझीच्या मुख्य भूमिकेत परतणार आहे. अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू आणि श्रेयस तळपदे यांनीही परतण्याची पुष्टी केली आहे. जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी आणि अश्विनी काळसेकर सारखे दिग्गज कलाकार देखील या यादीत आहेत. शर्मन जोशी परतण्याची अपेक्षा आहे, तर करीना कपूर खानची उपस्थिती अद्याप अंतिम झालेली नाही.
03 Feb 2026 01:15 PM (IST)
नेरळ ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून अनेक ऐतिहासिक विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र मागील काळात नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील विकासाचा बॅकलॉग तयार झाला आहे,हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी कर्जत पंचायत समितीवर निवडून जायचे आहे असे मतदारांना आवाहन नेरळ पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांनी केले.तर जिल्हा परिषद गटात अनेक विकासकामे केली असल्याने जनता आमच्या विश्वास ठेवील असे मत युवासेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे यांच्या माध्यमातून होत असून नेरळ जिल्हा परिषद गटामध्ये असा विकास साधायचा असल्याने आम्हाला विजयी करा असे आवाहन सुनीता मोरे यांनी केले.
03 Feb 2026 01:09 PM (IST)
कराड नगरपालिकेच्या सोमवारी पार पडलेल्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या तीन सदस्यांसह विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. त्यामुळे पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला वेग येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेच्या सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर होते. सोमवारी सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात झाली.
03 Feb 2026 01:00 PM (IST)
भाजपच्या बड्या नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. बारामती अपघात प्रकरण ताजे असताना मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये देखील बिघाड झाल्याचे समोर आले. यामुळे राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे. मंत्री पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
03 Feb 2026 12:50 PM (IST)
इंदोरमध्ये रॅपिडो बाईक चालकाने अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करून तिला स्वस्त कपड्यांच्या बहाण्याने खोलीवर नेले आणि लैंगिक अत्याचार केला. प्रकरणी आरोपीवर बलात्कार व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
03 Feb 2026 12:50 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरच्या आहिल्यानगर रोडवर मध्यरात्री भीषण रिक्षा अपघात झाला. रिक्षाचा चुराडा झाला असून चालकासह दोन जणांचा मृत्यू, तर दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत.
03 Feb 2026 12:40 PM (IST)
नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागातील 26 वर्षीय निवासी डॉक्टर ऋत्विक ठाकूर यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नुकताच PG अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय वर्तुळ हादरले आहे. कारण अस्पष्ट.
03 Feb 2026 12:20 PM (IST)
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात 10 वर्षीय चौथीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आई-वडील मजुरीसाठी बाहेर असल्याने तो एकटाच राहत होता. आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू






