धक्कादायक ! 21 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; 14 महिन्यांपू्र्वीच झाला होता विवाह (सौजन्य : iStock)
हिंगोली : हिंगोली शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या एनटीसी भागातील एका उद्यानात तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
शहरातील बावनखोली भागातील अंजली गजानन खंदारे (वय 20) ही तरुणी तिची आई, बहिण व भावासोबत राहते. अंजली एका खाजगी दवाखान्यात काम करते तर तिची आई घरकाम करुन उदरनिर्वाह करते. शुक्रवारी सकाळी अंजली कामावर जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. नेहमीप्रमाणे ती कामाला जात असल्यामुळे तिच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची शंका आली नाही.
दरम्यान, दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अंजलीने एनटीसी भागातील एका उद्यानात ओढणीने गळफास घेतला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच हिंगोली शहर पोलिसांनाही माहिती देण्यात आली.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगमनाथ परगेवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत अंजली हिचा मृतदेह खाली काढून उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. मयत अंजली हिच्या पश्चात आई, बहिण व भाऊ असा परिवार असल्याचे सांगण्यात आले.
पुण्यात 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, येरवडा कारागृहाच्या शेजारील प्रेसच्या जागेत असलेल्या जुन्या बंगल्यात एका १८ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे्. दरम्यान, तरुणाने आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही. साहिल विलास कांबळे (वय १८, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, आत्महत्या यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे. त्यात आता सोसायटीच्या उद्यानातच तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.