यवतमाळ मध्ये अशी एक अंधश्रद्धेची घटना घडली आहे की त्यामुळे यवतमाळ शहर हादरला आहे. एका भोंदू बाबाने आपल्या घरी यातनागृह तयार करून एका महिलेला आणि तिच्या मुलीला डांबून ठेवले. एवढेच नाही तर त्यांना गरम सळाखीने चटके सुद्धा देण्यात आले. मायलेकीवर दुष्ट आत्म्याचा वावर असल्याचं सांगत त्यांच्यावर हे कृत्य करण्यात आलं.
नागपूर हादरलं! प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायु पतीला संपवलं; नंतर नैसर्गिक मृत्यूचा बनाव आणि….
नेमकं काय घडलं?
यवतमाळ शहरातील कॉटन मार्केटमध्ये वंजारी फैलात राहणाऱ्या भोंदूंच्या बाबाच्या घरी शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून धाड टाकली आहे. या घरातील एकूण वातावरण आणि मायलेखीसाठी तयार केलेले यत्नगृह पाहून पोलिसांचाही थरकाप उडाला. पुढे आलेल्या माहितीनुसार, महादेव उर्फ माउली या नावाने ओळखल्या जाणारया भोंदूने स्वतःच्या घरात बुवाबाजीचे दुकान थाटले होते.
त्याने विभक्त राहणाऱ्या नीतू जयस्वाल या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यावर दृष्ट आत्म्याचा प्रभाव पडला आहे, असे सांगून तिला उपचाराची गरज असल्याचे सांगत घरी आणले. तिच्यासोबत 14 वर्षाची मुलगी त्रिशा सुद्धा भोंदू बाबाकडे राहू लागली. या भोंदूबाबाने अघोरी उपचार सुरु केले. या दोघींना डांबून ठेवण्यासाठी पडक्या जागेत पत्राची खोली तयार केली. या खोलीला यातनागृह असे नाव दिले. या खोलीतच दिवस रात्र मायलेकी राहत होत्या. त्यांना सध्या लघुशंकेसाठी ही बाहेर पडण्याची उजागरी नव्हती. तिथेच त्यांना या सर्व क्रिया कराव्या लागत होत्या. उपचाराच्या नावाखाली महादेव (भोंदू बाबा) त्या मायलेकींनी गरम सळाखीने चटके देत होता. मारहाण करत होता. त्या दोघींच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा पोलिसांना दिसल्या. सुरुवातीला या दोन्ही मायलेकी अतिशय धष्टपुष्ठ व मानसिक दृष्ट्या स्थिर दिसत होत्या, असे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.
अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
पोलिसांनी मे लेकीला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी हजर केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दोघींवर आघोरी उपचारा सोबतच भोंदू बाबाने शारीरिक अत्याचार केले का याचीही तपासणी केली जाणार आहे. त्रिशाच्या तक्रारीवरून भोंदू बाबा विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सातारा हादरला! प्रेमसंबंधातून वाद विकोपाला, आणि राहत्या घरी एका विवाहितेची गळा चिरून हत्या