नागपूर: प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायू झालेल्या पतीला पत्नीने संपवल्याची धक्कादायक घटना नागपुरातून समोर आली आहे. त्यांनतर पत्नीने पतीच्या हत्येनंतर नैसर्गिक मृत्यू (हार्ट अटॅक) झाल्याचा बनाव केला. मात्र हा बनाव फसला. शवविच्छेदन अहवालात ही नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचं समोर आलं. ही हत्या अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने करण्यात आली. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. आरोपी पत्नीचे नाव दिशा रामटेके असून आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबु टायरवाला असं प्रियकराचं नाव आहे. मृतकाचे नाव चांद्रसेन रामटेके आहे.
Tinder, Bumble वर बनावट प्रोफाइलद्वारे तरुणांची फसवणूक; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
नेमकं काय घडलं?
पुढे आलेल्या माहितीनुसार,दिशा रामटेकचे मृतक चंद्रसेन सोबत १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हा पासून ते घरी राहत होते. दिशा रामटेके घर खर्चासाठी पाण्याची कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती. या दरम्यान काही महिन्यापूर्वी तिची ओळख आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजा बाबौ याच्यासोबत झाली. काही दिवसांनी त्यांच्या दोघांमध्ये प्रेम संबंध वाढले. काही काळानंतर चंद्रसेनला संशय आला. त्यामुळे अनैतिक संबंधात अडसर नको म्हणून त्याचा काटा काढण्याचा कट रचला. दिशाने तिच्या प्रियकराच्या मदतीने झोपलेल्या चांद्रसेनच्या नका तोंडावर उशी ठेवून आणि गळा आवरून त्याची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी पत्नी दिशा आणि प्रियकर आसिफ अन्सारीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु केला आहे. अशी माहिती वाठोडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांनी दिली आहे.
पंढरपूर हादरलं ! पत्नीने मुलांसह आत्महत्या केल्याचे समजताच पतीनेही घेतला गळफास
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कौटुंबिक वादातून चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रकार घडला. यामध्ये महिलेने दोन मुलांसह आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे समजताच पती यानेदेखील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पत्नी मोनाली (वय 25), मुलगा कार्तिक (वय 6) आणि मुलगी प्रगती (वय 4), म्हमाजी आसबे असे आत्महत्या करणाऱ्यांचे नावे आहेत. या अनपेक्षित अशा प्रकाराने कासेवागात शोककळा पसरली आहे.
महिलेने आधी सेल्फी घेतली अन् नंतर आत्महत्या केली; पतीदेखत नदीत उडी मारली