सातारा: सातारा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शिवथर गावात राहणाऱ्या एका विवाहितेचा तिच्याच घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मृतक महिलेचे नाव ३० वर्षीय पूजा जाधव असे आहे. ही घटना सोमवारी (७ जुलै) ला घरी कोणी नसतांना घडली आहे. घरात कोणी नसल्याचं पाहून गळा चिरत खून करण्यात आला आहे. प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी आपली तासाची चक्रे दुरावत अवघ्या १२ तासात पुण्यातून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अक्षय रामचंद्र साबळे असे आहे. पोलिसांनी अक्षयची कसून चौकशी केली असता हा सर्व प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असल्याचं समोर आले आहे.
तू राज ठाकरेंच्या घरी जा, मी तुला विकत घेऊ शकतो; अर्धनग्न अवस्थेत मनसे नेत्याच्या मुलाची हुल्लडबाजी
नेमकं काय प्रकरण आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (7 जुलै) शिवथर येथे घडली आहे. पूजा जाधव हिचे अक्षय साबळे याच्यासोबत गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे. पूजा जाधव घरी एकटी असतांना आरोपी अक्षय रामचंद्र साबळे (वय 28, रा. शिवथर) तिच्या घरी गेला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि वादाच्या पार्श्वभूमीवर अक्षयने धारदार शस्त्राने पूजाचा गाला चिरून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. स्थानिक माहिती, तांत्रिक तपशील आणि फोन लोकेशनच्या आधारे आरोपीला शोधण्यात आले. आरोपीला रात्री उशिरा पुण्यातून टाका करण्यात आली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अक्षय साबळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नागपूर हादरलं! प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायु पतीला संपवलं;नंतर नैसर्गिक मृत्यूचा बनाव आणि….
प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायू झालेल्या पतीला पत्नीने संपवल्याची धक्कादायक घटना नागपुरातून समोर आली आहे. त्यांनतर पत्नीने पतीच्या हत्येनंतर नैसर्गिक मृत्यू (हार्ट अटॅक) झाल्याचा बनाव केला. मात्र हा बनाव फसला. शवविच्छेदन अहवालात ही नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचं समोर आलं. ही हत्या अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने करण्यात आली. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. आरोपी पत्नीचे नाव दिशा रामटेके असून आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबु टायरवाला असं प्रियकराचं नाव आहे. मृतकाचे नाव चांद्रसेन रामटेके आहे.