मुंबई: मुंबईतून अँटॉप हील येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने मालकाच्या घराच्या बाल्कनीमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिच्यावर चोरीच्या संशयातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव चोईसांग तामांग असे आहे.
हृदयद्रावक ! दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक; पत्नीसमोरच पतीला ट्रकने चिरडले
चोईसांग तामांग ही मूळची दार्जिलिंगची आहे. ती दोन वर्षांपासून ती अँटॉप हिल येथील आशियाना सोसायटीत घरकाम करीत होती. ती तिथेच राहत असल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह घराच्या बाल्कनीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अँटॉप हिल पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवलं. मात्र त्यापूर्वीच तरुणीचा मृत्यू झाला होता. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाइड नोट लिहून ठेवली आहे.
सुसाइड नोटमध्ये काय?
पोलिसांनी घराचा तपास केला तेव्हा पोलिसांना सुसाईड नोट सापडली. तिने त्यात लिहले होते मी प्रामाणिकपणे काम केले, काही चोरी केलेली नाही असे तिने लिहले आहे. या सुसाईड नोटमध्ये कुणावरही आरोप केलेला नाही आहे. तामांग हिच्या वडिलांचीही चौकशी केली जात असून घरमालकाकडून माहिती मिळवली जात आहे.
बोगस सोशल मीडिया पत्रकारांचा नवी मुंबईत धुमाकूळ ; प्रतिष्ठित चॅनेलची नावे वापरून ब्लॅकमेलिंगचे प्रकार
शहरात बनावट सोशल मीडिया पत्रकारांचा दहशतवादी कारभार वाढू लागला असून इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबवर खोट्या नावाने पत्रकारिता करण्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहेत. काही व्यक्ती प्रतिष्ठित न्यूज चॅनलच्या नावासारखी पेजेस व चॅनेल्स तयार करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेत आहेत आणि बार, लेडीज बार तसेच नाईट क्लबमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करून पैसे उकळत आहेत.हे बोगस पत्रकार पोलीस ओळखीचा धाक दाखवून बार मालक व ग्राहकांकडून पैशांची उघड मागणी करतात. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याच्या, किंवा चॅनेलवर टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारितेच्या नावाला या तोतया पत्रकारांनी तडा दिला आहे. प्रतिष्ठित मीडिया चॅनलची नावे पुढे एखादा शब्द जोडून नवीन अकाउंटस तयार केली जातात आणि या ‘विश्वसनीय’ वाटणाऱ्या नावांच्या आडून फसवणूक केली जाते. तथाकथित हे मोबाइल पत्रकार इतरांकडून व्हायरल झालेले व्हिडिओ डाउनलोड करून त्यावर स्वतःचा चॅनल लोगो लावतात व स्टिंग ऑपरेशनच्या नावाने पैसे मागतात. पैसे न मिळाल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही दिली जाते. रात्रीच्या वेळी असे प्रकार अधिक होत असल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हृदयद्रावक ! दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक; पत्नीसमोरच पतीला ट्रकने चिरडले






