File Photo : Suicide
आलेगाव : पातूर तालुक्यातील चोंढी येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हेदेखील वाचा : कंपाउंडमध्ये कचरा जाळताना भयंकर स्फोट, माजी आमदाराच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
विजय उर्फ गौतम खोडके (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तालुक्यातील चोंढी येथील रहिवाशी छाया खोडके या महिलेने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. छाया खोडके यांचा मुलगा विजय उर्फ गौतम खोडके याला दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी 8 दिवसांपूर्वी त्याने बकऱ्या विकल्या होत्या.
काही कामधंदा नसल्याने तो घरीच राहत होता. घटनेच्या दिवशी फिर्यादीने विजय याला चहा पिण्यासाठी आवाज दिला. पण आवाज देऊनही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर छाया यांनी त्यांच्या लहान मुलाला विजयला बोलविण्यासाठी पाठविले. तेव्हादेखील दरवाजा उघडला नाही.
हेदेखील वाचा : डोळे, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा…,लैगिंक अत्याचारानंतर हत्या! कोलकात्याच्या ‘निर्भया’ हत्येचे गुढ असे उकलले
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर विजयच्या भावाने खिडकी उघडून पाहिली तर त्याला विजय हा त्याच्या घरात लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळताच चान्नी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीआकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास केला जात आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
विजय खोडके याने गळफास घेऊन आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पण पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असून, त्यानंतर त्याच्या आत्महत्येचे कारण समजेल, असे सांगितले जात आहे.