मुंबई : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) म्हणजेच देशभरातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांची शुक्रवारी रँकिंग जारी करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील आयआयटी मुंबईने (IIT Mumbai) देशात सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. मागील वर्षी ही संस्था चौथ्या क्रमांकावर होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) रँकिंगमध्ये घसरण झाली असून २५ व्या स्थानी गेले असून विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) ४५ वे स्थान मिळवले आहे. राज्यातील एकूण १२ शैक्षणिक संस्थांनी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवले आहे. दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून (Union Ministry Of Education) हे रँकिंग जाहीर केले जाते. एनआयआरएफ रँकिंगमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (Indian Institute Of Technology Madras) या चेन्नईच्या संस्थेने प्रथम, तर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने (Indian Institute Of Science) द्वितीय स्थान कायम ठेवले आहे.
ओव्हर ऑल रँकिंग
१. मुंबई आयआयटी – तिसरे स्थान (८२.३५)
२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ- २५ वे स्थान (५६.९९)
३. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च-पुणे संस्था- २६ वे स्थान (५६.९१)
४. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी- २८ वे स्थान (५६.१६)
५. मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने ३३ वे स्थान (५४.८४)