मराठी माणसाच्या एकतेसमोर सरकारची सक्ती हरली; हिंदी भाषेचा 'जीआर' रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु असून राजकारण तापले आहे. प्रचारसभामधून आश्वासनांचा पाऊस पाडला जातो आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत सुरु असून आव्हानं देखील दिली जात आहेत. मात्र दोन्ही युतींकडून अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. महायुतीमधून पुन्हा एकनाथ शिंदे की महाविकास आघाडीमधून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याबाबत आता इंडिया आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या आपने महाविकास आघाडीला मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत मोठा सल्ला दिला आहे..
लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरवाल आणि आप पक्ष प्रचाराच्या मैदानामध्ये उतरला आहे. आपने विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला असला तरी अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रामध्ये प्रचारसभा घेणार आहेत. आप पक्षाकडून महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील उमेदवारांसाठी सभा घेतली जाणार आहे. यासाठी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. मात्र त्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवरुन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा या आशयाचे वक्तव्य आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केले. यावेळी त्यांनी थेट शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. संजय सिंह म्हणाले की, हरियाणातील विधानसभा निवडणुकीत जो प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल तर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे अशी मागणी संजय सिंह यांनी केली आहे.
संजय सिंह म्हणाले, “माझं वैयक्तिक मत आहे, जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा नंतर जाहीर केला तर एकमेकांचे आमदार महाविकास आघाडीत फूट पाडू शकतात. हरियाणामध्ये हेच झालं की काँग्रेसचे गट एकमेकांना पाडायला निघाले, त्यात काँग्रेसचे नुकसान झाले. त्यामुळे माझं म्हणणं आहे नंबरवाल्या खेळामध्ये तुम्ही फसू नका. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्त काम केले आहे. मराठी माणूस, मराठी स्वाभिमान या गोष्टीसुद्धा त्यांच्यासोबत जोडल्या जातात. उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवलं तर महाविकास आघाडीचा फायदा होईल, हे माझं वैयक्तिक मत आहे,” असे स्पष्ट मत संजय सिंह यांनी व्यक्त केले आहे.