Photo credit- Social Media
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला जेमतेम 15 दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानुसार, अनेक नेतेमंडळींकडून विविध विधानं केली जात आहेत. अशातच आमदार नवाब मलिक यांनी भाष्य केलं. ‘राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. 2019 च्या निकालानंतर काय घडेल याचा अंदाज कुणी बांधला होता का? 2024 च्या निकालानंतरही काही घडू शकते. अजित पवार किंगमेकर राहतील, अशी खात्री असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : बंडोबा थंड होणार की…! उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस
नवाब मलिक यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यानुसार, आता ते निवडणूक लढवत आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘मागील 3-4 महिन्यांपासून शिवाजीनगर मानखुर्दची लोकं मला भेटायला येत होती. मी निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह होता. आज या मतदारसंघात ड्रग्सचा विळखा आहे. गुंडाची दहशत आहे. लोक दहशतीत जगत आहेत. पण मीच का असे विचारले असता याआधी जे कुणी निवडणूक लढवत होते, त्यांना दहशत दाखवून, खोटे गुन्हे दाखल करून बाजूला सारले जात होते.
याशिवाय, धमक्या आल्यानंतर ते गायब होतात. त्यामुळे तुम्ही कुठेतरी ताकदीने लढाल असा तिथल्या लोकांना विश्वास आहे. त्यामुळेच मी आता या मतदारसंघात निवडणूक लढवत आहे, असेही नवाब मलिकांनी सांगितले. 2019 च्या विधानसभा निकालानंतर काय घडणार याचा अंदाज कुणी बांधला होता का, तसेच 2024 च्या निकालानंतरची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. परिस्थितीनुसार, काहीही घडू शकते त्यात अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत असतील, असा दावा आमदार नवाब मलिक यांनी केला आहे.
खोटे गुन्हे दाखल करून सारले जाते बाजूला
दरम्यान, मी 3 वेळा कुर्त्यातून आमदार होतो, वेळा अणुशक्तीनगरमधून आमदार होतो. आता मी तिसऱ्या जागेवरून निवडणूक लढवतोय जो अणुशक्तीनगरच्या बाजूला आहे. मला निवडणूक लढायची नव्हती. मी जेलमधून सुटल्यानंतर माझ्या मुलीने मतदारसंघात काम पाहिले. मी कार्यालयात बसल्यानंतर लोक तिला भेटायला यायचे. त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही तिला उभं करू हे ठरवले.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! शरद पवारांना धक्का; ‘या’ नेत्याने सोडली राष्ट्रवादीची साथ, आता करणार…