'मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं, हीच शिवसेनेची चूक; काँग्रेसकडून ठाकरे पुन्हा टार्गेट
मुंबई : विधानसभा निव़डणुकीचा एकतर्फी निकाल लागला आहे. यंदाची निवडणूक ही अटी तटीची होण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात महायुतीने विराट असे यश मिळवले. यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. अगदी विरोधी पक्षनेत्याच्या बाकावर बसण्यासाठी सुद्धा कोणत्याही पक्षाला दावा करता येणार नाही. या निकालावर कॉंग्रेसकडून सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले आहेत.
पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय घेतला आहे. नाना पटोले म्हणाले की, “देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा महत्त्वाचा अधिकार आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत केवळ दोन तासांत निकाल लावत आहे. आणि आमदार अपात्रेच्या सुनावणीसाठी वर्षानुवर्षे लावत आहेत. यावरुन ईव्हीएम मशीनबद्दलचे प्रेम लक्षात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे असा त्यांचा दावा तर तुम्हाला टक्केवारी जाहीर करण्यासाठी एवढी रात्र उशीर का लागला?” असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नाना पटोले पुढे म्हणाले की, “निकालाच्या दिवशी 11 वाजून 59 मिनिटांना तुम्ही मतदान किती झाले ते जाहीर करता. दुसऱ्या दिवशी तीन वाजता परत तुम्ही 1 टक्का वाढवता. 9 लाख मतं अचानक कशी वाढली. हे रात्री का नाही जाहीर केलं. दुसऱ्या दिवशी का केलं? यामध्ये पारदर्शकता कुठे राहिली? याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिली आहे. या संदर्भात आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देऊन अधिकृतपणे यावर चर्चा करुन आयोगाला भूमिका काय याची मागणी करणार आहोत. हा विषय गंभीर आहे,” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
नाना पटोले म्हणाले की, “आम्ही हारले म्हणून असं करतोय असं विरोधक म्हणत आहेत. मात्र हा विषय खरोखरच गंभीर आहे. हारले म्हणून नाही..आमचं जरी सरकार येतं असतं आणि मतमोजणीमध्ये या प्रकारची तफावत असती तरी आम्ही हीच भूमिका घेतली असती. कारण देशामध्ये लोकशाही वाचली पाहिजे,” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
“स्वातंत्र्याची लढाई आम्ही निस्वार्थीपणे लढली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा इतिहास सर्वांना माहिती आहे. पूर्वी जनतेच्या भीतीमुळे सरकारला काम करावं लागत होतं. मात्र आता सरकारच्या मनामध्ये जनतेची भीतीच राहिलेली नाही. महाराष्ट्रामध्ये निकाल लागून पाच ते सहा दिवस झाले. पण या दिवसांमध्ये सरकार स्थापन करण्यात आलेलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच असून त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही. पीकांचे व बी बियाणांचे खरेदी केंद्र सुरु झालेली नाहीत. शेतकऱ्यांवर वाऱ्यावर सोडलं आहे. महागाई रोज वाढत आहे. आता यापुढे 50 टक्के लाडक्या बहिणींना पैसे दिले जाणार नाहीत,” असा घणाघात कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.