फोटो - सोशल मीडिया
पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक होऊन त्याचे निकालही समोर आले आहेत. यामध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांच्या महायुतीला चांगले यश मिळाले आहे. महायुतीने बहुमताचा आकडाही पार केला आहे. तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. याशिवाय, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही एकही जागा मिळवता आली नाही. त्यावरच राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांची बैठक घेतली.
हेदेखील वाचा : मागील सरकारमध्ये जे झालं ते नव्या सरकारमध्ये होणार नाही; भाजप ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
राज ठाकरे यांनी पुण्यातील पराभूत उमेदवारांची बैठक घेतली असून, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांच्या बैठकीत दिले. विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे देखील माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले. राज्यात एकही आमदार निवडून न आलेल्या राज ठाकरे यांनी पुण्यात पराभूत उमेदवारांची बैठक घेतली.
दरम्यान, मनसेच्या या बैठकीत उमेदवारांनी आपली मते मांडताना, ईव्हीएम मशिनविषयी अधिक तक्रारी केल्या. त्यासंदर्भात बहुतेक उमेदवारांचा सूर होता. तसेच प्रतिस्पर्धी उमेवारांकडून केला गेलेल्या पैशांच्या वापरापुढे निधी कमी पडल्याचे कारणही काही उमेदवारांनी सांगितले. यावेळी पक्षाचे नेते बाबू वागसकर, राजू उंबरकर, बापू धोत्रे, बाळा शेडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अर्धा तास झाली पदाधिकाऱ्यांची बैठक
पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. अर्धा तास चाललेल्या या बैठकीत राज ठाकरे यांनी उमेदवारांची बाजू समजून घेतली. त्यांनतर विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरुन आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश ठाकरे यांनी दिले.
हेदेखील वाचा : राज्याचा मुख्यमंत्री अखेर दिल्लीने ठरवला ! अमित शहांकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब, शपथविधीही ठरला?