महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची तारीख व ठिकाणही ठरलं (फोटो सौजन्य-X)
Maharashtra vidhansabha Results 2024 News in Marathi: विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले असून या निकालात महायुतीने महाविकास आघाडीचे सुपडासाफ केला आहे. आतापर्यंत भाजपाने 132 तर शिवसेने 55 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 40 जागांवर आघाडी घेतली. तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर महायुतीला आघाडी असून अनेक उमेदवार विजयी देखील झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपला 120 पेक्षा जास्त जागांवर आघाडी दिसत असून भाजपच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं दिसून येत आहे अशातच आता मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला. त्यातच महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 25 नोव्हेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणूनच महाराष्ट्राचा नवीन सरकारमधील मुख्यमंत्री कोण हे लवकरच उलगडणार आहे.
२५ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे, मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप निश्चित नसलं तरी २६ नोव्हेंबरला विधानसभा बर्खास्त होणार आहे, त्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाणार असल्याची माहिती आहे. याचदरम्यान भाजपचे निरीक्षक रविवारी मुंबईत पोहोचतील. त्याचवेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्याचवेळी भाजपकडून त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ‘मुख्यमंत्री भाजपचाच असेल, मला वाटतं देवेंद्र फडणवीस असतील’ असं मोठं विधान केलं आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर महाराष्ट्र आणखी प्रगती करेल. यामुळेच लोकांनी आम्हाला कौल दिला आहे. मी विशेषतः राज्यातील लाडक्या भगिनींचे आभार मानतो, असं मतं निवडणुकीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
मोठी बातमी! शरद पवार महाविकास आघाडीची साथ सोडणार? भाजप दिग्गज नेत्याचा दावा
महाराष्ट्रातील ट्रेंड दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील जनतेचे आभार, मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. हा आमच्यासाठी ऐतिहासिक आणि ऐतिहासिक विजय आहे. याशिवाय महायुतीच्या कामाला जनतेची मान्यता आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात 09 फेऱ्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 41093 मतांनी आघाडीवर आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 12 फेऱ्यांनंतर 17906 मतांनी आघाडीवर आहेत. याशिवाय बारामती मतदारसंघातून अजित पवार ४३६१९ मतांनी पुढे आहेत.
शिवसेना (उद्धव गट) नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती पुढे असल्याचे दाखविणाऱ्या निवडणुकीच्या ट्रेंडवर म्हणाले, ‘मला यात मोठे षडयंत्र दिसत आहे. आम्ही हा जनादेश मानत नाही, निवडणूक निकालात काहीतरी गडबड आहे. हा जनादेश कसा मान्य करायचा, असा प्रश्नही लोकांना पडला असेल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस १९ जागांवर, शिवसेना (उद्धव गट) २० जागांवर आणि राष्ट्रवादी (शरद गट) १३ जागांवर आघाडीवर आहे.
कोथरूड मतदार संघातून भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा विजय