2019 ला मतदान झालं, त्यावेळेस चुकीच्या पद्धतीने...', मतदानानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले? (फोटो सौजन्य-X)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. बुधवारी (20 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजल्यापासून सर्व 288 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. याचदरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर ते म्हणाले की, आज लोकशाहीचा सण असून सर्वांनी सहभागी होऊन मतदान करावे. यातून महाराष्ट्र बळकट होईल.मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येकाला मी मतदान करण्याच आवाहन करतो” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज सहकुटुंब त्यांनी ठाण्याच्या कोपरी-पाचापाखाडी विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासमोर स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचं आव्हान आहे.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी संवाद साधताना म्हणाले, “2019 मध्ये जे झाले ते जनता विसरलेली नाही, जनादेश महायुतीला होता, पण महायुती सरकार बनवू शकली नाही. जनतेने त्यांची (महाविकास आघाडी) अडीच वर्षांची सत्ता आणि आमची अडीच वर्षांची सत्ता पाहिली आहे. त्यांनी सुरू केलेला विकासही महायुती प्रचंड बहुमताने स्थापन करणार आहे.
राज्यात मतदान सुरूच होताच अनेक ठीकाणी EVM पडले बंद, केंद्राबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी
या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. विरोधी आघाडीची महाविकास आघाडी (एमव्हीए) पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. सत्ताधारी MVA चा भाग असलेला भाजप 149 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 81 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी 59 जागांवर निवडणूक लढवत आहे. MVA मध्ये समाविष्ट काँग्रेस 101 जागांवर, शिवसेना (UBT) 95 आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) 86 जागांवर निवडणूक लढवत आहे. बहुजन समाज पक्ष आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) यासह छोटे पक्षही निवडणूक लढवत आहेत. बसपने 237 तर AIMIM ने 16 उमेदवार उभे केले आहेत. यंदा 4 हजार 136 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. या 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 158 पक्ष विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर अपक्ष यादीत 2 हजार 086 उमेदवार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचं हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
“महायुतीचे सरकार स्थापन होईल पण..”, अजित पवार यांनी बारामतीच्या काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क