धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण; राष्ट्रपती भवनात सन्मान स्वीकारताना हेमा मालिनींच्या डोळ्यांत अश्रू (Photo Credit- X)
सोमवारी पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती मुर्मू यांनी २ ‘पद्मविभूषण’, ६ ‘पद्मभूषण’ आणि ५८ ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान केले. या पुरस्कार सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या विजेत्यांच्या पहिल्या यादीत १९ महिलांचा समावेश आहे; तर कला, क्रीडा आणि समाजसेवेतील उत्कृष्ट योगदानासाठी १६ व्यक्तींना मरणोत्तर (Posthumously) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय क्षेत्रातील प्रमुख नेते उपस्थित होते.
President Droupadi Murmu confers #PadmaVibhushan upon veteran actor #Dharmendra Singh Deol (Posthumous), popularly known as the ‘He-Man’ of Bollywood One of the most versatile and successful actors in the history of Hindi cinema, he left an indelible mark on Indian cinema… pic.twitter.com/HQ2lwzMtXO — PIB India (@PIB_India) May 25, 2026
राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वतीने त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री, हेमा मालिनी यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारला. यंदाच्या एकूण यादीत दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के.टी. थॉमस यांच्यासह पाच नामवंत व्यक्तींना ‘पद्मविभूषण’ जाहीर करण्यात आला आहे.
क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक बड्या चेहऱ्यांनी या सोहळ्यात हजेरी लावली. एकूण १३१ जणांच्या यादीतील १३ व्यक्तींना ‘पद्मभूषण’ तर ११३ व्यक्तींना ‘पद्मश्री’ सन्मान जाहीर झाला आहे. पहिल्या टप्प्यात सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये खालील दिग्गजांचा समावेश होता:
बिहारचे ‘पद्मश्री’ विजेते (मरणोत्तर) विश्व बंधू यांच्या पत्नी इंदू देवी यांनी पुरस्कार स्वीकारताना केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार मानले. पतीच्या देशसेवेची आणि योगदानाची दखल घेतल्याबद्दल भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “आम्हा सर्वांना याचा अत्यंत अभिमान वाटतो. हा पुरस्कार स्वीकारताना आमचे संपूर्ण कुटुंब भावूक झाले असून डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले आहेत. आम्ही भारत सरकारचे मनापासून ऋणी आहोत.”






