अकोल्यात वाढती महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात 'वंचित' कडून बैलगाडी मोर्चा
वंचित बहुजन आघाडी अकोलाच्यावतीने आज (सोमवार, २५ मे) वाढती महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अकोलामध्ये भव्य बैलगाडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. देशभरातल्या वाढत्या इंधन दरांमुळे सध्या नागरिकांमधे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (सोमवार २५ मे) पुन्हा एकदा इंधन दरात वाढ झाली असून गेल्या फहा दिवसांत पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ झाली असल्याने राज्यात सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागात नागरिकांना याचा फटका जास्त प्रमाणात बसताना दिसत आहे.
या मोर्च्यात घोडे, गाढवं, बैलगाडी घेऊन नागरिकांनी सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला. अकोल्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल टंचाईचा सामना करावा लागतोय, अशी भावना यावेळी नागरीकांनी व्यक्त केली. मोर्च्यात अकोल्याचे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्च्यात हजारो लोकांनी सहभाग घेतला.
या आंदोलनाबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून याबाबत भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “आज अकोल्यामध्ये, वंचित बहुजन आघाडीने वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि त्याचा सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांवर होणाऱ्या गंभीर परिणामांविरोधात एक अनोखा बैलगाडा मोर्चा काढला. बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरून, आम्ही हा संदेश देऊ इच्छित होतो की इंधनाच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, आणि सदोष व कुचकामी सरकारी धोरणे समाजाला जुन्या पद्धती आणि संघर्षमय जीवनाकडे परत ढकलत आहेत. जे एके काळी भूतकाळाचे प्रतीक होते, ते आता आजच्या आर्थिक गोंधळाचे प्रतिबिंब बनले आहे.”
आज अकोला में वंचित बहुजन आघाड़ी ने बढ़ती पेट्रोल-डीज़ल कीमतों और आम जनता व किसानों पर पड़ रहे उसके गंभीर असर के खिलाफ एक अनोखा बैलगाड़ी मोर्चा निकाला। बैलगाड़ियों के साथ सड़कों पर उतरकर हमने यह संदेश देने का प्रयास किया कि ईंधन की कीमतें अब आम लोगों की पहुंच से बाहर हो चुकी हैं… pic.twitter.com/zavvZOE5Lc — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 25, 2026
ते पुढे म्हणाले, “हे आंदोलन केवळ एक निदर्शन नव्हते, तर सर्वसामान्य माणसावर असलेल्या प्रचंड आर्थिक भाराचे एक प्रभावी प्रतीक होते. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवन अधिक महाग झाले आहे. यामुळे शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे इंधनाच्या किमती आणि महागाईपासून तात्काळ दिलासा देण्याची मागणी केली. या आंदोलनाला प्रचंड जनसमर्थन मिळाले, ज्यातून वाढत्या महागाईबद्दलचा व्यापक संताप आणि चिंता स्पष्टपणे दिसून आली. सर्वसामान्य माणसाच्या आवाजाकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही.”
“महागाई मानव मोदी” यांचा देशावर पुन्हा हल्ला…” वाढत्या इंधन दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमक






