फोटो सौजन्य - Social Media
अशामध्ये अभिनेता हेमंत ढोमेही चांगलाच तापला आहे. त्याने पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो की, “सरकार हे भारत देशाचं आहे आणि या देशातील जनतेनेच ते निवडून दिलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं ही सरकारची मूलभूत जबाबदारी आहे. देशात कोणताही संघर्ष किंवा आंदोलन उभं राहिल्यास, त्यावर संवादातून तोडगा काढणं हीदेखील सरकारची जबाबदारी आहे. आता सरकारने याबाबत शक्य तितक्या लवकर पावलं उचलावीत. सोनम वांगचूक यांच्या जीवाशी संबंधित परिस्थितीकडे दुर्लक्ष होऊ नये. कोण चूक आणि कोण बरोबर, याचा निर्णय नंतरही घेता येईल. पण सध्या एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या जीवाची काळजी घेऊन या प्रश्नावर मार्ग काढणं आवश्यक आहे.”
२५ वर्षांनंतर रंगभूमीवर नवाजुद्दीन सिद्दीकींची घरवापसी; ‘नकाब’साठी मुलगी शोरासोबत शिकागोला रवाना
हेमंत ढोमे या आधीही विविध सामाजिक विषयावर आपले मत मांडत असायचा. सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या तब्येतीची काळजी म्हणून हेमंत याने पोस्ट शेअर केली आहे. सोनम वांगचुक यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. विविध क्षेत्रातून पाठिंबा दिला जात आहे. तसेच त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावे अशी मागणी केली जात आहे.






