फोटो सौजन्य - Social Media
एका मुलाखतीत स्नेहल तरडे यांनी सांगितले की, अभिनयाची आवड असूनही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना अनेक वर्षे अभिनय क्षेत्रापासून दूर राहावे लागले. मात्र, ‘देऊळ बंद २’मध्ये त्यांची निवड ही केवळ त्या प्रवीण तरडेंच्या पत्नी आहेत म्हणून नव्हे, तर त्या भूमिका समर्थपणे साकारू शकतात म्हणून करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, “माझं करिअर आणि संसार उभा राहावा यासाठी स्नेहलने तिच्या अभिनय कारकिर्दीचा त्याग केला. त्यामुळे आज मी तिला एखाद्या चित्रपटात संधी दिली, तर त्यात चुकीचं काहीच नाही. ज्याच्याकडे पात्रता नाही त्याला संधी देणं म्हणजे नेपोटिझम; मात्र गुणवत्ता असलेल्या व्यक्तीला तिच्या योगदानाची दखल घेत संधी देणं ही कृतज्ञता आहे.”
‘देऊळ बंद २’ या चित्रपटातून शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील विषयावर भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटात मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली असून प्रसाद ओक, महेश मांजरेकर, मंगेश देसाई आणि ओम भूतकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या १२ दिवसांत या चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याची माहिती समोर आली आहे.






