( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. परब कुटुंबातील आसावरी आणि खानोलकर कुटुंबातील गौतम हे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पण तेजस्विनीला हे लग्न मान्य नाही. तिला परब कुटुंबासोबत कोणतेच नाते नको आहे. मात्र मुलांसाठी तिने या दोघांच्या लग्नाला होकार दिला आहे. पण दुसरीकडे मात्र, हे लग्न मोडण्यासाठी ती अनेक प्रयत्न करत आहे.
नुकताच झी मराठी वाहिनीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत पाहायला मिळत आहे की जय आणि शर्वरी एका पार्टीत गेले आहेत. या पार्टीसाठी शर्वरीने एक खास लूक केला आहे. पार्टीत जोडप्यांना एक टास्क दिला जातो. पेपर फोल्डिंग टास्कमध्ये शेवटी जय शर्वरीला उचलून घेतो. यावेळी त्यांची जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ”सोशल मीडियावर नात्याला मिळणार नवे नाव, पार्टीवाली लव्हस्टोरी खाऊन जाणार भाव”, असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे.
View this post on Instagram
सध्या या प्रोमोवर प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. दरम्यान जयला मुली आवडत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून जयची आणि शर्वरीची मैत्री होताना दिसत आहे. आता मैत्रीचे रुपांतर प्रेमात होणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.






