CJP Parliament March LIVE: उपोषण सोडण्यास तयार पण.....; सोनम वांगचुक यांच्या तीन अटी सरकार मान्य करणार का?
CJP Parliament March LIVE: पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 20 जुलै रोजी आपले उपोषण संपवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रामध्ये उपोषण सोडण्यासाठी तीन अटी नमूद करण्यात आल्या असून, त्यापैकी कोणतीही एक अट पूर्ण झाल्यास उपोषण समाप्त करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोनम वांगचुक यांनी पत्रात म्हटले आहे, “प्रिय मित्र आणि सहकारी, तुम्हांपैकी अनेकांनी मला माझे उपोषण कधी संपवणार, असा प्रश्न विचारला आहे. यापूर्वी समर्थकांना दिलेल्या माहितीनुसार, मी 20 जुलै रोजी माझे उपोषण संपवणार आहे.”
– सरकारने शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील अपयशांची, विशेषतः पेपरफुटीच्या घटनांची जबाबदारी स्वीकारावी.
– किंवा, मी आणि सीजेपीचे (CJP) नेतृत्व संसदेत पोहोचल्यानंतर विविध पक्षांचे खासदार आणि नेते हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचे आश्वासन द्यावे.
– जर प्रकृती किंवा इतर कारणांमुळे संसदेत जाणे शक्य झाले नाही, तर विविध पक्षांचे खासदार आणि नेते रुग्णालयात येऊन वरील आश्वासने द्यावीत.
पत्राच्या शेवटी वांगचुक यांनी, “सफदरजंग रुग्णालयातील बेकायदेशीर नजरकैदेत असून माझ्या हालचाली, अभिव्यक्ती आणि संवादाच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत,” असही म्हटलं आहे.
दरम्यान, जंतर-मंतरवरील आंदोलन अद्याप सुरू असून, आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली असून, महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्यानंतर सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही उपोषण सुरू केले आहे. सीजेपीचा आज ( 20 जुलै) रोजी संसदेकडे मोर्चा काढण्यात येणार आहे.
दिल्ली प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आदेशानुसार, जंतर-मंतर येथील अधिकृत आंदोलनस्थळ वगळता इतर ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, मोर्चे काढणे किंवा निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. संसदेचे अधिवेशन लक्षात घेऊन सार्वजनिक सुरक्षा आणि शासकीय आस्थापनांच्या संरक्षणासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
WHEN WILL I END THE FAST….!
Not withstanding my health my fast continues till after the Sansad Chalo March, and will be broken only under the following circumstances… pic.twitter.com/kaOGx2Nk4T — Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 20, 2026






