फोटो सौजन्य - Social Media
मोहसीन अख्तरला त्याच्या कुटुंबियांकडून तसेच मित्रपरिवाराकडून सोशल मीडियावर अभिनंदनाचा तसेच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, अनेकांनी त्याच्या निकाहाचे क्षण सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, याच पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, स्वतः मोहसीनने या संदर्भात एक भलामोठा कॅप्शन लिहत त्याच्या लग्नाची पोस्ट शेअर केली आहे.
मोहसीनच्या दुसऱ्या पत्नीचे नाव निधा भट्ट आहे. त्याने निधासह त्याच्या निकाहचे क्षण पोस्ट करत कॅप्शन दिले आहे की, “निस्वार्थ भावना, खरं प्रेम आणि संयम व कृतज्ञतेने भरलेलं मन… स्वतःचं मन कायम स्वच्छ ठेवा, प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जात राहा आणि अल्लाहने आखलेली वाटच आपल्या आयुष्यासाठी सर्वोत्तम असते, यावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर अल्लाहने माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी सुंदर आणि मनापासून प्रेम करणारी जोडीदार पाठवली. @nidhab_, तुझ्या प्रामाणिकपणामुळे आणि प्रेमामुळे माझं आयुष्य उजळून निघालं. माझ्या प्रिय, त्यासाठी तुझे मनापासून आभार.”
पुढे मौजीसाठीही त्याने विशेष ओळी लिहल्या आहेत. त्याने नमूद केले आहे की, “आणि मौजी, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलास तरी माझ्यावर तुझी कृपा आणि प्रेम कायम आहे, याची जाणीव मला दररोज होते. हे सगळं तुझ्याच आशीर्वादाचं फळ आहे. आज तू जिथे असशील तिथे अधिक शांत आणि समाधानी असशील, अशी आशा आहे. तुझी खूप आठवण येते आणि तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. आमच्यासाठी तुझ्या प्रार्थना कायम असू देत.”
2024 मध्ये झाला होता घटस्फोट!
मोहसीन अख्तर एक काश्मिरी व्यावसायिक आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर त्याच्या पेक्षा वयाने जवळजवळ 9 ते 10 वर्ष मोठी आहे. 2016 साली मोहसीनने उर्मिलासह लग्नगाठ बांधली पण त्यापूर्वी उर्मिलाला धर्म परिवर्तन करण्याची अट ठेवली. परंतु, जेव्हा उर्मिलाने राजकारणाचा मार्ग निवडला तेव्हा तिने कोणतेही धर्म परिवर्तन केले नसल्याचे जाहीर केले. शेवटी, कालांतराच्या अबोलानंतर मोहसीन आणि उर्मिला एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांच्यात घटस्फोट झाला.






