मुंबई : राज्यात सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये (Wine) वाईन विक्री करण्यास ठाकरे सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयावर काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे तर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा निर्णय घेण्यामागे फार मोठं अर्थकारण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
गोव्यात पत्रकार परिषदेला आयोजित करण्यता आली होती त्यावेळी ते बोलत होते. सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्री करण्यास परवानगीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.महाराष्ट्राला ‘मद्य’राष्ट्र बनवण्यासाठी नेमकी डील कुणाशी, कोणती आणि कशी झाली? असा सवाल करत त्यांनी सरकारला चांगलत धारेवर धरलं. कुणाच्या हितासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. काही लोकं गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करत आहेत. हा शेतकऱ्यांकरता घेतलेला निर्णय नाही आहे. काही लोकांनी नव्याने दारूच्या कंपन्या किंवा एजन्सी घेतल्या आहेत. कोण आहेत ते तुम्ही शोधा. अशा लोकांच्या भल्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, वाईन तयार करणाऱ्या एका मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती बैठक कुठे झाली? विदेशात झाली का? हा प्रश्नही आम्हाला विचारायचा आहे. हा काही साधा घेतलेला निर्णय नाहीये तर याच्यामागे फार मोठं अर्थकारण आहे. अर्थपूर्ण पद्धतीने घेतलेला निर्णय आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचं हे काही स्वप्न या सरकारचं दिसत आहे त्याचा आम्ही निषेध करतो.
[read_also content=”वाघाळ्याच्या जयवंताबाई वयाच्या ९२ व्या वर्षी करतात शेती https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/at-the-age-of-92-jaywantabai-of-waghala-started-farming-in-shikrapur-pune-nrka-228898.html”]