कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी ही सौदर्यासोबतच शरीराच्या रचनेसाठीही महत्वाची झाली आहे. ज्यामुळे शरीरामधील अनेक समस्या दुर केल्या जातात अशा सर्जरीमधील निष्णांत डॉक्टर म्हणून डॉ गौरव शल्य यांची ओळख आहेत. ते मुंबईतील प्रसिद्ध कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन आहेत. त्यांना 16 वर्षांचा अनुभव असून घाटकोपर येथील शल्य हॉस्पीटल आणि अॅस्थेटिक आर्टचे ते संचालक आहेत. डॉ गौरव यांनी M.S. मध्ये सुवर्णपदक मिळाले असून त्यांनी भारतातील सर्वोत्तम असलेल्या लखनऊ येथील KGMC मधून जनरल सर्जरी आणि एमसीएच केले आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईत काम केले असून डीवाय पाटील मेडिकल कॉलेज नेरुळ नवी मुंबईतही सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम केले. थ्री बेस्ट रेट.इन द्वारे त्यांची मुंबईतील 3 सर्वोत्तम प्लास्टिक सर्जन म्हणून निवड झाली.
1000 पेक्षा जास्त रुग्णांमधील 30000 पेक्षा जास्त लिपोमा रिमुव्हल
डॉ गौरव हे भारतातील सर्वोत्तम कॉस्मेटिक सर्जनपैकी एक असून ते सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी करतात. त्यांनी लिपोसक्शनद्वारे लिपोमाचे डागविरहित काढण्याचे तंत्र आणि साधन शोधून काढले आणि 1000 पेक्षा जास्त रुग्णांमधील 30000 पेक्षा जास्त लिपोमा काढले आहेत. त्यांनी 3000 हून अधिक Gynecomastia शस्त्रक्रिया केल्या आणि त्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया तंत्र तयार केले. लिपोसक्शन तंत्राने सडपातळ होण्यासाठी जगभरातील रुग्ण त्यांच्याकडे येतात. ते नाकाची कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करतात ज्याला राइनोप्लास्टी म्हणतात. तसे इतर सर्व चेहर्यावरील कॉस्मेटिक शस्त्रक्रिया जसे की फेस लिफ्ट, नेक लिफ्ट आणि चीन लिपोसक्शन या शस्त्रक्रिया ते करतात ज्यामुळे तरुण आणि सुंदर दिसण्यास मदत होते. चेहऱ्यावरील मुरुमांनंतरच्या डागांसाठी डॉक्टर फॅट ग्राफ्टिंग करतात जो त्यासंबंधी सर्वोत्तम आणि कायमचा उपाय आहे.
आजच्या काळात तरुण मुलांमध्ये सामान्यतः गायनेकोमास्टिया (पुरुष स्तन) विकसित होते जे जंक फूड आणि लठ्ठपणामुळे होते. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि आत्मविश्वास कमी होतो. ते ऑपरेशनद्वारे काढले जाणे आवश्यक आहे कारण या स्थितीत औषध मदत करत नाही. बहुतेक वेळा पालकांना याची जाणीव नसते आणि त्यांच्या मते शस्त्रक्रियेस नकार देणे हे स्वाभाविक आहे परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी ऑपरेशन हा एकमेव आणि सर्वोत्तम उपाय आहे आणि तो शरीरावर कोणतेही दुष्परिणाम न करता वेदनारहित, डागरहित आणि सुरक्षित आहेत. डॉ गौरव शल्य या सर्जरीचे निष्णांत आहेत.
रुग्णांसाठी विश्वासार्ह सर्जन ठरत आहेत डॉ गौरव शल्य
कॉस्मेटिक शस्त्रक्रिया आता भारतात डॉ गौरव शल्य यांच्या सारखा निष्णांत डॉक्टरांमुळे सुरक्षितरित्या होत आहेत. महत्वाचे म्हणजे या सर्जरी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे केवळ सेलिब्रिटी अथवा श्रीमंतच नव्हे तर सामान्य माणूस ही या सर्जरी करु शकतो. तसेच सुरक्षित आणि किफायतशीर सर्जरी भारतामध्ये उपलब्ध होत असल्याने परदेशातील अनेक लोक याकरिता भारतात येत आहेत. या रुग्णांसाठी विश्वासार्ह सर्जन ठरत आहेत डॉ गौरव शल्य.