फोटो सौजन्य - Social Media
शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास कधीही जास्त भयंकर असतो. बहुतेक व्यक्ती असे असतात, जे शारीरिक त्रासाला सामोरे जाण्यास सक्षम असतात, परंतु मानसिक त्रासावेळी भलेभले गपगार होऊन जातात. मानसिक त्रासांमध्ये व्यक्तीची विचार करण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे व्यक्तीची वागणूक बदलू लागते. इतरांशी वागणूक बदलल्याने इतर लोकंही त्या व्यक्तीला ठीक वागवत नाही, याचा उलट परिणाम पुन्हा त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर होतो. शरीरावरील जखम कधी ना कधी ठीक होत असते, परंतु मनावर झालेला घाव आयुष्यभर तसाच राहतो. आपल्या मनावर आणि मेंदूवर सतत त्या गोष्टीचा हल्ला होतो, परिणामी आपली कार्यक्षमता बिघडते.
हे देखील वाचा : नवरात्रीच्या उपवासात साबुदाणे खाण्याऐवजी बनवून पहा चविष्ट भगर पुलाव
मानसिक त्रासामधून बाहेर येण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. ज्याच्या साहाय्याने व्यक्ती मानसिक त्रासापासून दूर होतो. यातील सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे व्यक्तीची आवड. व्यक्तीची आवड व्यक्तीला मानिसक त्रासापासून लांब ठेवते. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवड आहे तर तुम्ही ती गोष्ट नक्कीच करत चला. तुम्हाला मानसिक त्रास मुळीच त्रास देणार नाही. यामध्ये, महत्वाचे पैलू असते ते म्हणजे कला. कला जोपासणे खूप महत्वाचे असते. याने मनाला वेगळीच शांती मिळते आणि समाधान मिळतो. एकंदरीत, कलेची जोपासना करणे असे काम आहे, जे आपल्याला स्वतःहून करावेसे वाटते. त्यामुळे या कामाचा आपल्या मनावर तसेच मेंदूवर कधीच भार जाणवत नाही.
मंडला डिजाईन
विशेषता स्त्रिया या कलेकडे जास्त आकर्षित असतात. मंडला या शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेतुन झाली असून याचा अर्थ पवित्र वर्तुळ आहे. मंडला डिजाईन काढताना अनेक वर्तुळ आणि बारीक नक्षीकाम करावे लागते, ज्यासाठी फोकस आणि अटेन्शनची गरज असते. या कलेने एंजाइटी कमी होते आणि मेंदूचे आरोग्य संतुलित राहते.
कलर ब्लेंडींग
कलर ब्लेंडींग करता असताना कलाकार आपल्या भावनांना तसेच नाकारात्मकतेला कागदावर फेकून देतो. नकारात्मकता गेल्याने सकारत्मकता वाढते. व्यक्ती तणावमुक्त होतो, त्याची इमोशनल ग्रोथ होते. महत्वाचे म्हणजे कलर ब्लेंडींग केल्याने मानवाची स्मरणशक्ती वाढते.
कॅलिग्राफी
सध्याच्या युगात या कलेचा भलताच ट्रेंड सुरु आहे. सोशल मीडियावर या कलेच्या कलाकारांनी मोठा मार्केट जिंकलं आहे. कॅलिग्राफी केल्याने मानवामध्ये धीर वाढतो तसेच फोकस वाढतो. हे केल्याने स्ट्रेस कमी होतो, डोकं शांत होतं तसेच आत्मविश्वास वाढतो. मी
डूडल्स
पेन आणि पेपरच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या या कलेतून अस्थिर मेंदूला शांतात मिळते. जास्त विचार करणे तसेच इंजाईटीपासून दिलासा मिळतो. आपल्या विचारांवर परिणाम करत असल्याने डूडल्स या कलेच्या मार्फत मेंटल क्लॅरिटी मिळते.