502898881
केसांची निगा कशी घ्यावी ज्यामुळे केस गळणे बंद होईल
केसांत कोंडा (Dandruff) व केस गळतात ! तर कच्च्या पपईचा लेप १०-१५ मिनिट डोक्यावर लावा.
मेंदीत भरपूर पोषकतत्व असतात जे केसांसाठी चांगले असतात. मेंदी पाण्यात मिक्स करून लावल्याने देखील फायदा होतो.
मधाने केस गळणे (hair fall) थांबवले जाऊ शकते. १ चमचा मधात १ चमचा लिंबूरस मिक्स करून केसांना लावा व अर्धा तासानंतर केस धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्याने केसांचे गळणे कमी होते. मधात दालचीनी मिक्स करून लावल्याने देखील केस गळणे बंद होते.
Olive oil थोडे गरम करा. यात १ च. मध+1 च. दालचीनी पूड मिक्स करा. अंघोळीच्या अगोदर 15 मिनिट केसांवर लावा.या टिप्स मुळे केस गळणे बंद होतील.
दुध/दही यात बेसन मिक्स करून लेप करा व याने केस धुवा. यामुळे केसांना चमक येऊन केसांचे गळणे बंद होईल.
अनेकांना केस गळण्याची समस्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होते. तळलेले मसालेदार अन्नपदार्थात पोषक तत्वांची कमी असते. ज्यामुळे शरीराला झिंक, प्रोटीन, आयरन, कॕल्शियम, विटामिन मिळत नाही जे निरोगी केसांना गरजेचे आहे.यासाठी हिरव्या भाज्या, फळे, सुकामेवा, दुध यांचे सेवन केले पाहिजे.
दहीचा वापर Hair loss थांबवण्यासाठी १ चांगला उपाय आहे. यामुळे केसांना आवश्यक पोषकतत्व मिळते. केस धुण्याच्या १/२ तास आधी दही केसांना नीट लावून जेव्हा सुकेल तेव्हा धुवून घ्या.दह्यात थोडासा लिंबूरस मिक्स करून देखील वापरू शकता. लिंबूरस +दही यांना एकत्र करून १ लेप तयार करा आणि अंघोळी अगोदर केसांना लावा. लेप लावल्यानंतर अर्धा तासाने धुवा. या उपायाने केसांचे गळणे कमी होईल.
काहीवेळा शरीरात रक्त संचार नीट न झाल्याने केसांना आवश्यक पोषण मिळत नाही. ज्यामुळे केस कमकुवत होऊन गळतात. रक्तसंचार नीट होण्यासाठी योगा आणि एक्सरसाईज करायला पाहिजे. यामुळे केसांपर्यंत पोषकतत्व पोहचतील आणि as a result केस उगवतील.
केसांना लांब करण्यासाठी, केसांचे गळणे थांबवण्यासाठी आठवड्यातून एकदा रोजमेरी तेल लावून केसांना मालिश करा. नारळ तेलदेखील केसांचे गळणे थांबवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
केसांना तेल लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात. यासाठी केस धुण्याच्या १ तास आधी केसांना तेल लावा. केस सुंदर आणि मजबूत बनतात.
केसांची निगा चांगली राहावी म्हणून निदान आठवडयातून एकदा तरी केस धुवावेत. यासाठी शिकेकाई/ रिठा यांचा केस धुण्यासाठी वापर करावा. केस धुतल्यावर ते पुसून चांगले वाळवावेत. तसेच केस दररोज विंचरावेत. म्हणजे उवा होणार नाहीत. नाहीतर उवा, कोंडा, लिखा केसात होऊ शकतात. त्यातून उवा झाल्याच तर गोडेतेल आणि कपूर एकत्र करून केसांना लावावा.
अंघोळ करताना रोज केस धुवावेत.
स्त्रियांच्या बाबतीत आठवडयातून १/२ वेळा केस स्वच्छ व चोळून धुवावेत म्हणजे केसातील मळ आणि घाण निघून जाते आणि केस स्वच्छ राहतात.
केस नियमित स्वच्छ ठेवल्यामुळे केसांत उवा, लिखा, कोंडा व जत होत नाहीत.
अंघोळ झाल्यानंतर केस कोरडया व स्वच्छ टॉवेलने/ फडक्याने कोरडे करावे.
केस धुतल्यावर कोरडे करावेत.
केसांना रोज तेल लावावे.
केस रोज विंचरावेत.
मुलांनी केस नियमितपणे कापावे.
मुलींनी लांब केसांच्या वेण्या घालाव्यात.






