फोटो सौैजन्य: I Stock
धावपळीच्या आयुष्यामुळे बऱ्याचदा आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत या दिवसात पाणी शरीरात जास्त जाणं गरजेचं आहे. पुरेस पाणी पिणं आणि वेळच्या वेळी लघवीला जाणं हे महत्त्वाचं आहे. तुमची दैनंदिन जीवनशैली, आहार आणि याचबरोबर महत्त्वांच आहे ते म्हणजे वेळच्या वेळी लघवीला साफ होणं.
रोजच्या कामाच्या व्यापात किंवा बाहेर फिरायला गेल्यावर अनेक जण लघवी रोखून धरतात. त्याचप्रमाणे सतत बाहेर फिरतीचं काम असणारे देखील कमी पाणी पितात कारण लघवीला जायला लागू नये म्हणून. तर बऱ्याच जणांना झोपेत असल्यामुळे देखील लघवीला जाण्याचा कंटाळा येतो. मात्र हा कंटाळा भविष्यात जीवघेणा ठरु शकतो. .जर तुम्ही देखील सतत लघवी रोखून धरत असाल किंवा लघवीला जाण्याचा कंटाळा करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.
वेळच्या वेळी शरीराच्या उत्सर्जित क्रिया करणं हे महत्त्वाचं आहे. त्याचुप्रमाणे दरवेळी आपली किडनी स्वच्छ ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही लघवीला जाण्यास कंटाळा करत असाल तर याचा शरीरावर गंभीर परिणाम होण्यास सुरुवाात होते. लघवीला रोखून धरणं म्हणजे हळूहळू शरीरात स्लो पॉईजन होण्यासारखं आहे.
याबाबत सांगताना तज्ज्ञ म्हणतात की,जर तुम्ही सतत लघवी रोखून धरत असाल तर फक्त किडनीच नाही तर संपूर्ण शरीराला याचं नुकसान होतं. तुम्ही जर 10 मिनिटं लघवी रोखत असाल तर याचा परिणाम मेंदूवर होतो. अस्वस्थता वाढते. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. जर तुम्ही सतत लघवी रोखत असाल तर यामुळे निर्णयक्षमता कमी होते. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. त्याचबरोबर जर तुम्ही एक तास लघवी रोखून ठेवली तर मूत्र पुन्हा एकदा किडनीत जाते आणि त्यामुळे किडनीचं कार्य बिघडतं.
याचबरोबर तीन तास लघवी रोखल्याने UTI म्हणजेच मूत्र मार्गातील समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे उन्हाळे लागणे यासारखा त्रास होतो. 6 तास लघवी रोखल्याने मूत्राशयावर याचा परिणाम होतो आणि लघवी अडकून राहते. तसंच 7 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ रोखून धरल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लघवी रोखून धरणं हे काही वेळापूरतं जरी ठिक वाटत असलं तरी याचे दूरगामी परिणाम भयंकर असतात. त्यामुळे सतत लघवी रोखून धरण्याची सवय असल्यास आजही सोडून द्या. या घातक सवयीमुळे शरीराच्या इतर अवयवाचं कार्य बिघडतं, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.