दातांचे दुखणे वाढल्यास 'हे' घरगुती उपाय करून तात्काळ मिळेल आराम
दैनंदिन आहारात अतिगोड किंवा चिकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातांसंबंधित समस्या वाढू लागतात. या समस्या वाढू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतात. दात दुखणे, दातांना कीड लागणे किंवा दातांमध्ये पोकळी निर्माण होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर दातांची योग्य ती काळजी घ्यावी. दातांमधील वेदना प्रामुख्याने रात्रीच्या वेळी वाढतात. दातांमध्ये वाढलेल्या वेदनांमुळे कीड लागणे किंवा इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. थंड पदार्थांचे सेवन, अतिगोड पदार्थ खाणे, दातांच्या स्वच्छतेचा अभाव, कॅल्शियमची कमतरता, बॅक्टेरिया इत्यादी समस्यांमुळे दात काही वेळा खराब होऊन जातात. दिवसभर दातांमध्ये होणाऱ्या वेदना काही वेळा रात्रीच्या वेळेस वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे रात्रीच्या वेळी दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात वारंवार उष्णतेमुळे तोंड येत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून तात्काळ मिळवा आराम, उष्णता होईल कमी
रात्रीच्या वेळी दातांमध्ये असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी अनेकदा लोक मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या पेनकिलरच्या गोळ्या खातात. पेनकिलरच्या गोळ्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. दातांच्या आजूबाजूला असलेल्या नसांमध्ये जळजळ होण्यास सुरुवात झाल्यानंतर दातांमधील वेदना वाढू लागतात. झोपल्यानंतर डोक्याच्या रक्तवाहिन्या वेगाने शरीरात फिरतात. त्यामुळे दातांमधील वेदना वाढू शकतात.
दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी लिंबाचा वापर करावा. लिंबामध्ये असलेले गुणधर्म दातांमधील कीड आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करतात. दातांवर वेदना होत असलेल्या ठिकाणी लिंबाचा तुकडा लावून ठेवा. यामुळे दातांमधील कीड आणि पोकळी भरून निघेल. घरगुती उपाय केल्यास तात्काळ आराम मिळतो. मात्र या वेदना जास्त वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
भारतीय मसाल्यांमध्ये लवंगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो., लवंग आरोग्यच्या दृष्टीने अतिशय प्रभावी आहे. दात दुखण्यास सुरुवात होण्यास झाल्यानंतर दात दुखत असलेल्या ठिकाणी लवंगचा तुकडा भरून ठेवावा. यामुळे वेदना कमी होतील. पण दातांवर ठेवलेली लवंग गिळू किंवा चावून खाऊ नये. कारण लवंगमध्ये जास्त उष्णता असते.
मीठ हा पदार्थ सर्वच आजारांसाठी अतिशय प्रभावी आहे. दातांमध्ये किंवा हिरड्यांमध्ये वेदना झाल्यास मिठाच्या सहाय्याने दात स्वच्छ करून घ्यावा. यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण, वेदना आणि कीड नष्ट होऊन दात स्वच्छ होतील. हिरड्यांमध्ये होणाऱ्या जळजळपासून आराम मिळवण्यासाठी मिठाच्या पाण्याने दात स्वच्छ करून घ्यावे.