फोटो सौजन्य - Social Media
आशिया खंडाच्या दक्षिणेकडील देशांमध्ये तर खासकरून भारतामध्ये एखाद्याचा डोळा फडफडला तर त्याची नाळ लगेच शुभ अशुभ सारख्या गोष्टींकडे जोडली जाते. देशातील ग्रामीण भागामध्ये अशा गोष्टी फार पाळल्या जातात. उजवा डोळा फडफडला कि शुभ असते आणि डाव्या डोळ्याचे फडफडणे म्हणून अशुभ अशा अनेक गोष्टी ग्रामीण भागामध्ये प्रचलित आहेत. शहरामध्येही असे अनेक लोकं मिळून जातील, जे या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून पाळतात. कामाच्या वेळी डोळा फडफडला तर लोकं काम करायचे ठेऊन देतात आणि त्यासाठी दुसऱ्या क्षणाची प्रतीक्षा करतात. परंतु, डोळे फडफडणे ही एक शारीरिक गोष्ट आहे, याला शरीरातील काही घटक कारणीभूत असतात. याचा शुभ आणि अशुभ या गोष्टींशी काहीच संबंध नसतो.
हे देखील वाचा : नितीन गडकरींनी शेअर केली झटपट तयार होणारी वडा पावची रेसिपी, वाचा आणि जाणून घ्या
शरीराचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी शरीराला योग्य पोषणतत्त्वे देणे फार महत्वाचे असते. यामध्ये व्हिटॅमिनचा फार मोठा असतो. डोळे फडफडणे या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार शरीरातील व्हिटॅमिन असते. व्हिटॅमिन डेफिशिअन्सी या समस्येला कारणीभूत असते. चला तर मग जाणून घेऊया डोळे फडफडण्या मागचे वैद्यकीय कारण:
डोळे फडफडणे ही एक शारीरिक समस्या आहे, ज्याचे मूळ कारण शरीरातील काही पोषणतत्त्वांची कमतरता असते. या समस्येमध्ये मुख्यत्वे व्हिटॅमिन बी12 आणि मॅग्नेशियम यांची कमी असते. शरीरात या व्हिटॅमिन आणि खनिजांची पातळी योग्य नसल्यास स्नायूंमध्ये ताण येतो आणि त्यामुळे डोळ्याच्या स्नायूंमध्ये अस्वस्थता निर्माण होते, ज्यामुळे डोळे फडफडू लागतात. तसेच, कामाचा ताण, झोपेची कमी, स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे, किंवा डिहायड्रेशन हे देखील डोळे फडफडण्याचे प्रमुख कारण ठरू शकते. ही समस्या अस्थायी असते आणि योग्य आहार घेऊन ती दूर करता येऊ शकते.
हे देखील वाचा : तिरुपती बालाजीच्या मंदिरात का वापरला जातो खाण्याचा कापूर? जाणून घ्या कापूरचे फायदे
डोळ्यांचे आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी अंडी, मांस, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा. बदाम, पालक तसेच अंजीरसारखे मॅग्नेशिअम असलेले आहार घ्या. चांगली झोप घ्या आणि सतत पाणी प्या. जास्त स्क्रीनटाईम शक्यतो टाळा. याने डोळ्यांचे आरोग्य नीट राहील.