महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात वडा पाव आवडीने खाल्ला जातो. देशात मुळातच असा कोणी असावा ज्याला वडा पाव हा खाद्यपदार्थ माहिती नाही. मुंबईकरांची तर सुरुवातच वडापावने होत असते. हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. अनेकदा रविवारचा बेत म्हणून घरी वडापाव बनवले जाते. नोकरदार वर्गांसाठी तर कमी पैशात मिळणारा हा एक चविष्ट नाश्ता आहे.
अनेकदा काहीजण घरी वडापाव बनवायला बघतात मात्र बाजारात मिळतो तसा परफेक्ट वडापाव काय त्यांच्याकडून बनवला जात नाही. अशात महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शेअर केलेली वडापावची रेसिपी सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.
नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत त्यांना वडापावबाबतचे आपले प्रेम व्यक्त केले. त्यांना पुण्यातील प्रसिद्ध प्रभात हॉटेलचा वडापाव फार आवडतो असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी प्रेक्षकांसोबत वडापावची टेस्टी रेसिपीदेखील शेअर केली आहे. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही एकदम परफेक्ट वडापाव घरीच तयार करू शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – घरी बनवा बाजारासारखी चटपटीत पुदिन्याची चटणी, योग्य पद्धत जाणून घ्या
हेदेखील वाचा – तव्यावर बनवा पंजाबी स्टाइल पनीर कुलचा, रेसिपी व्हायरल, त्वरित जाणून घ्या