(फोटो सौजन्य: istock)
सध्याच्या या डिजिटल युगात युगात कामाचा ताण पूर्वीहून अधिक वाढला आहे. त्यातही स्पर्धा एवढी वाढली आहे की, लोक आपल्या आरोग्याकडे आणि पर्सनल आयुष्याकडे दुर्लक्ष करून तासनतास कामात व्यस्त राहू लागले आहेत. विशेषत: तरुण पिढी, जे आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करण्यास तयार आहेत. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या कामात यश मिळवण्यासाठी लोक इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करत आपल्या कामात इतके बुडून जातात की त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचेही भान राहत नाही.
मात्र तुम्हाला माहिती आहे का? की ही सवय तुमच्या आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी तसेच तुमच्या प्रोडक्टिविटीसाठीही हानिकारक ठरू शकते. भारताच्या आर्थिक सर्वेक्षणात याबाबतचे काही धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत, जी दीर्घकाळ काम करणाऱ्यांसाठी धोक्याची सूचना देत आहेत. आज आपण या लेखात यावरच चर्चा करणार आहोत.
Gas cylinder ची डिलिव्हरी घेण्यापूर्वी ही छोटी गोष्ट घरात ठेवा, हजारो रुपयांची बचत होईल
खुर्चीला चिटकून राहणाऱ्यांना व्हा वेळीच सावध
70-90 तास काम करण्याची चर्चा असताना सरकारचा हा सर्व्हे समोर आला आहे. आठवड्यात 60 तासांपेक्षा जास्त काम करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, असे या सर्वेक्षणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, जे लोक दिवसातून 12 तास किंवा त्याहून अधिक वेळ खुर्चीला चिकटून राहतात, त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जरी जास्त काम हे प्रगतीचे मोजमाप मानले जात असले तरी सत्य हे आहे की जर तुम्ही आठवड्यातून 55-60 तासांपेक्षा जास्त काम केले तर तुमचे आरोग्य धोक्यात येते. या सर्वेक्षणात अनेक संशोधनाच्या परिणामांचा हवाला देण्यात आला आहे, ज्यातून ही गंभीर बाब समोर आली आहे.
दरवर्षी 12 अब्ज दिवस दुःख आणि चिंतेमुळे वाया जातात
सर्वेक्षणात आढळून आले आहे की अनेक गोष्टींचा आपल्या प्रोडक्टिविटीवर परिणाम होत असतो. जे उत्तम बॉससोबत काम करतात त्यांनाही दर महिन्याला सुमारे 5 दिवस काम करावेसे वाटत नाही. कारण फक्त सिर्फ वर्कप्लेसच नाही तर इतर अनेक गोष्टीही प्रोडक्टिविटीवर परिणाम करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अभ्यासानुसार, जगभरातील नैराश्य आणि चिंतेमुळे दरवर्षी लोक सुमारे 12 अब्ज दिवस कामावर नाही जात, परिणामी अंदाजे $1 ट्रिलियनचे नुकसान होते. म्हणजेच दररोज सुमारे सात हजार रुपयांचे नुकसान होत आहे.
कामाच्या तासांवर वाद
आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये कामाच्या तासांबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या, जे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचे चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांच्या चर्चेनंतर काही आठवड्यांनंतर आले आहे ज्यात त्यांनी कर्मचाऱ्यांना घरी बसण्याऐवजी रविवारसह आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला गेला. त्यांनी इन्फोसिसचे को-फाउंडर नारायण मूर्ती यांच्या 70 तास आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या टिप्पण्यांचाही उल्लेख केला. मात्र, यावरून सुब्रमण्यम यांच्यावर बरीच टीका झाली होती. आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी याला बर्नआउट म्हटले होते, तर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याविषयी सांगितले होते.
चाळिशीतही त्वचेवर दिसून येणार नाही वृद्धत्व, Young Skin साठी ‘या’ बॉडी स्क्रबचा वापर करा
आर्थिक सर्वे काय सांगतो?
भारताची स्वप्ने पूर्ण करायची असतील, तर लहानपणापासूनच मुलांच्या जीवनशैलीकडे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे आर्थिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. याशिवाय आजकाल कार्यालयातील कामकाजाचे वातावरणही चांगले नाही. कामाचा अतिरेक आणि तासनतास एकाच जागी बसून राहणे यामुळे लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे, ज्याचा देशाच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या सर्व गोष्टींकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.