(फोटो सौजन्य: Pinterest)
गॅस सिलेंडर ही प्रत्येक घराची गरज आहे. याशिवाय काम करणे आता अशक्य आहे. आजकाल तर गावाकडेही गॅस सिलेंडरचा वापर होतो अशात याशिवाय घरात कोणतेही अन्न शिजवणे जवळजवळ अशक्य आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला या गॅस सिलेंडरची मोठी मदत होत असते. त्यातच आता गॅस सिलेंडरचे दर हे गगनाला भिडले आहेत. होम डिलिव्हरीनंतर गॅस सिलेंडरची किंमत 1,000 रुपयांपर्यंत आहे. पण अनेक वेळा डिलिव्हरी करणारे लोक यात तुमची फसवणूक करतात, ज्यामुळे तुम्हाला दरमहा खूप पैसे गमवावे लागतात.
अनेकांना हे ठाऊक नाही की आपल्या एका शुल्लक चुकीमुळे आपण आपले नुकसान करून घेत असतो. गॅस सिलेंडरचे वाढते दर पाहता तुम्ही याकडे सतर्कतेने लक्ष दिले पाहिजे आणि आम्ही सांगत असलेल्या या उपायाचे पालन केले पाहिजे. आज या लेखात आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडरबाबत एक अशी ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची फसवणूक टाळू शकता.
चाळिशीतही त्वचेवर दिसून येणार नाही वृद्धत्व, Young Skin साठी ‘या’ बॉडी स्क्रबचा वापर करा
(फोटो सौजन्य: Pinterest)
सिलेंडरमध्ये असते कमी गॅस
गॅस सिलेंडरचे वजन आणि गॅसचे वजन किती असते हे फार कमी लोकांना माहिती असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, घरगुती गॅस सिलेंडरचे वजन हे साधारण 14.2 किलो असते. त्याच वेळी, रिकाम्या सिलेंडरचे वजन सुमारे 16 किलो असते. अशा प्रकारे, भरलेल्या सिलेंडरचे वजन अंदाजे 29.7 किलो आहे. म्हणजेच जर तुम्ही गॅस सिलेंडरची डिलिव्हरी घेत असाल तर गॅस सिलेंडरचे वजन 29.7 च्या आसपास असावे. जर वजन यापेक्षा कमी असेल तर समजा की डिलिव्हरी व्यक्तीने गॅस सिलेंडरमध्ये कमी गॅस भरला आहे किंवा त्या सिलेंडरमधून गॅस बाहेर काढला आहे. सिलेंडरच्या सीलची उपस्थिती सिलेंडर चांगल्या स्थितीत असल्याचा खात्रीशीर पुरावा नाही. कारण बऱ्याचदा सिलेंडरमध्ये कमी गॅस भरल्यानंतरही सील लावले जाते.
घरी आणा ही मशीन
एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जेव्हाही तुम्ही सिलेंडर खरेदी करता तेव्हा डिलिव्हरी करणाऱ्याला त्याचे वजन करायला सांगा. जर त्याने वजनाची मशीन नसल्याची सबब सांगितली तर तुम्ही वजनाची मशीन खरेदी करू शकता. ही वजन करण्याची मशीन तुम्हाला ऑनलाइन किंवा स्टोअरमध्ये 200 ते 300 रुपयांना मिळेल. त्यात एक हुक आहे, तो हुक सिलेंडरला लावा आणि सिलेंडर उचला. जर सिलेंडरचे वजन 29.7 असेल तर समजा की गॅस सिलेंडरमध्ये पूर्ण गॅस आहे.
सिलेंडरची डिलिव्हरी घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.