मध्यप्रदेशमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट,11 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक जखमी;मालकासह तीन आरोपींना अटक

मध्यप्रदेशच्या हरदा येथील फटाका कारखान्यात लागलेल्या आगीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या प्रकरणी पोलिसांनी कारखान्याच्या मालकासह तिघांना अटक केली आहे.

    मध्यप्रदेशमधून एक मोठी घटना समोर येत आहे. हरदा येथील फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग (MP Fire News) लागली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारखान्याच्या दोन मालकांसह तिघांना अटक केली आहे. स्फोटानंतर आरोपी दिल्लीला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.

    कारखान्यात स्फोट होऊन लागली आग

    मीडिया रिपोर्टनुसार, मध्यप्रदेशमधील हरदा येथील मगरधा मार्गावर असलेल्या एका फटाका कारखान्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक स्फोट झाला. काही कळायच्या आता एका पाठोपाठ एक अनेक स्फोट झाले. हे स्फोट इतके भीषण होते की अनेक किलोमीटर पर्यंतच्या परिसरात त्याचा आवाज ऐकू गेला. या आगीची झळ आजूबाजूच्या 60 हून अधिक घरांनाही लागली आणि या घरांनीही पेट घेतला. 50 पेक्षा जास्त अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तर सुरक्षिततेच्या दृष्टीने आजूबाजूच्या 100 पेक्षा जास्त घराना रिकामं करण्यातं आलं.

    11 जणांचा मृत्यू, 175 जण जखमी

    मध्य प्रदेशातील हरदा फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून 175 जण जखमी झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे. तर, या प्रकरणी तिघांना कारखान्याच्या मालकासह तीन तीघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये राजेश अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफिक खान यांचा समावेश आहे. हे तीनही आरोपी दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत होते अशी माहिती समोर आली आहे.